आता तुम्ही फेव्हरेट कार्टून ‘छोटा-भीम’ आणि ‘मोटू-पतलू’द्वारे करू शकता मोठी कमाई, जाणून घ्या कसे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   मुलांचे फेव्हरेट कार्टून छोटा भीम, मोटू आणि पतलू सीरीज बनवणारी कंपनी आता बाजारात आपले आयपीओ आणण्याचा प्लॅन करत आहे. म्हणजे आता ही गेमिंग प्लेटफॉर्मची कंपनीसुद्धा लवकरच मार्केटमध्ये लिस्ट होईल. देशातील दिग्गज गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांची गुंतवणूक कंपनी नजारा टेक्नॉलॉजीने आयपीओ सादर करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. कंपनी या आयपीओद्वारे सुमारे 750 ते 950 कोटी रूपये जमवण्याची योजना बनवत आहे. याशिवाय नोमुरा, जेफरीज आणि आयसीआयसीआय सिक्युरिटीजला इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून नियुक्त केले आहे.

आयपीओने गुंतवणुकदारांना केले मालामाल

इंग्रजी वृत्तपत्र इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, कंपनीचा आयपीओ या वर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये येऊ शकतो. मागच्या वर्षीपासून आतापर्यंत बाजारात आयपीओने गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. याशिवाय टेक्नॉलॉजी कंपन्यांनी आयपीओमध्ये गुंतवणुकीत स्वारस्यदेखील खुप वाढवले आहे.

गेमिंग प्लॅटफॉर्म कंपनी

नजारा डायव्हर्सिफाईड एक गेमिंग प्लेटफॉर्म आहे. ही कंपनी छोटा भीम, मोटू आणि पतलू सीरीजसह वर्ल्ड क्रिकेट चॅम्पियनशिपसाठी प्रसिद्ध आहे.

किती आहे अनलिस्टेड मार्केटमध्ये शेयर प्राइज

अनलिस्टेड शेयर मार्केटमध्ये या कंपनीच्या शेयरचा भाव एप्रिलपासून आतापर्यंत सुमारे 65 टक्के वाढला आहे. यावेळी या शेयरचे बाजार मुल्य 770 रूपये आहे. तर, एप्रिल महिन्यात या शेयरची प्राइज 500 ते 550 रुपयांच्या दरम्यान आहे.

जारी करू शकते नवे शेयर्स

बाजारात गेमिंग प्लॅटफॉर्म कंपनीचा हा पहिला आयपीओ असेल. याशिवाय असे समजले जात आहे की, कंपनी आयपीओमध्ये नवीन शेयर्स जारी करू शकते. याशिवाय सध्याच्या शेयर धारकांना आपले शेयर विकण्याची परवानगी देऊ शकते.

कंपनीने नाही दिली कोणतीही माहिती

कंपनीने आतापर्यंत आपल्या आयपीओबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. सेबीच्या परमिशननंतर या आयपीओचा रस्ता मोकळा होईल. सध्या अपेक्षा आहे की लवकरच आणखी एक आयपीओ तुम्हाला बंपर कमाईची संधी देऊ शकतो.

जाणून घ्या कंपनीबाबत

3 ए फायनान्शियल सर्व्हिसेसचे संस्थापक रंजन शाह यांच्यानुसार, या कंपनीवर कोणत्याही प्रकारचे कर्ज नाही. याशिवाय मागच्या 5 वर्षामध्ये कंपनीचा बिझनेस खुप वाढला आहे. कंपनीने यावर्षी प्राइव्हेट प्लेसमेंटने सुमारे 14 कोटी रूपये जमवले होते, ज्यासाठी 728 रुपयांच्या दराने शेयर जारी केले होते. आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये कंपनीने 4.38 कोटी रूपयांचा नफा कमावला होता.