Rakesh Jhunjhunwala Portfolio Stock | रू. 2900 वर जाईल टाटा ग्रुपचा हा स्टॉक, राकेश झुनझुवाला यांचा आहे फेव्हरेट, आता खरेदी केल्यास मोठा नफा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Rakesh Jhunjhunwala Portfolio Stock | टाटा ग्रुप (Tata Group) च्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर टायटनच्या शेअर्सवर डाव लावू शकता. शेअर बाजारातील बिगबुल राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांनी टाटा समूहाच्या या शेअरवर डाव लावला आहे. (Rakesh Jhunjhunwala Portfolio Stock)

 

दोन ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल आणि आयसीआयसीआय सिक्युरिटीजने शेअर खरेदीचा सल्ला दिला आहे आणि त्यावर खरेदीचे रेटिंग दिले आहे. टायटनचा शेअर 1.40% च्या तेजीसह 2,120.95 रुपयांवर व्यवहार करत होता.

 

2900 रुपयांवर जाईल शेअर
मोतीलाल ओसवाल यांनी टायटनच्या शेअरची टार्गेट प्राईस 2900 रुपये ठेवली आहे. तसेच, टायटनवर ’बाय’ रेटिंग कायम ठेवले आहे. राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओचा भाग असलेला टाटा समूहाच्या कंपनीचा शेअर बीएसईवर 2 टक्क्यांनी वाढून 2,138 रुपयांवर खुला झाला होता. (Rakesh Jhunjhunwala Portfolio Stock)

 

1,88,698 कोटी रुपयांच्या मार्केट कॅपसह, स्टॉक 5-दिवस, 20-दिवस, 50-दिवस, 100-दिवस आणि 200-दिवसांच्या मूव्हींग अ‍ॅव्हरेजपेक्षा कमी व्यवहार करत आहे. गेल्या एका वर्षात 46 टक्क्यांहून जास्त रिटर्न दिला आहे.

 

दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी या लार्ज-कॅप स्टॉकमध्ये गुंतवणूक करून मोठा नफा कमावला आहे. कारण गेल्या 10 वर्षांत तो 800 टक्क्यांहून जास्त वाढला आहे. त्याच वेळी, आयसीआयसीआय सिक्युरिटीजने टायटन शेअर्सला रेटिंग रू. 2,092 टार्गेट प्राईससह खरेदीचे रेटिंग अपग्रेड केले आहे.

600 नवीन स्टोअर्स उघडण्याची योजना
टायटनने शुक्रवारी शेअर बाजाराला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कंपनीने पुढील पाच वर्षांत दागिन्यांचा व्यवसाय 2.5 पटीने वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
टायटन कंपनीने पुढील तीन वर्षांत 300 शहरांमध्ये 600 हून अधिक स्टोअर्स उघडण्याची योजना असल्याचे सांगितले.

 

बीएसई शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार, भारतीय दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्याकडे टायटनमध्ये 3.98% हिस्सा आहे,
तर त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे 31 मार्च 2022 पर्यंत कंपनीमध्ये 1.07% इक्विटी आहे.

 

(डिस्क्लेमर : – याठिकाणी केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती (Share Performance Information) दिली आहे.
हा गुंतवणुकीचा सल्ला नसून शेअर मार्केट मधील (Stock Market) गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते.
त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे.
www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Rakesh Jhunjhunwala Portfolio Stock | rakesh jhunjhunwala portfolio tata group stock titan may go up to 2900 rupees expert buliish

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sanjay Raut on Nana Patole | ‘मुंबईत काँग्रेसचा महापौर कधी होता, हे नाना पटोले यांना आठवतंय तरी का?’ – संजय राऊत

 

Nashik Crime | धक्कादायक ! 24 वर्षीय युवकाची धारदार शस्त्रांनी वार करुन हत्या

 

Edible Oil Price | सर्वसामान्यांना काहीसा दिलासा ! मोहरी, शेंगदाणा तेलाच्या दरात घसरण; जाणून घ्या