Rakesh Jhunjhunwala | ‘या’ 5 कारणांमुळे राकेश झुनझुनवाला म्हणाले असावेत का? – ‘आता आपली वेळ आलीय !’

नवी दिल्ली : Rakesh Jhunjhunwala | एका राष्ट्रीय हिंदी चॅनलने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या मंचावरून देशातील दिग्गज गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांनी म्हटले की, भारताचा टाइम आला आहे. भारतीय शेयर बाजार (Stock Market) च्या बिगबुलनुसार, लोक म्हणतात की ’आपला टाइम येईल…परंतु मी म्हणतो, आपला टाइम आला आहे.’ अखेर राकेश झुनझुनवाला यांनी का म्हटले की, आपला टाइम आला आहे? यापाठीमाग पुढील पाच कारणे असू शकतात…

1. इकॉनॉमी (Economy) मध्ये वेग :

सरकारचा इन्फ्रास्ट्रक्चरवर 100 लाख कोटी रुपये खर्च करण्याचा प्लान आहे. यातून नागरिक आणि व्यावसायिक सुविधा विकसित केल्या जातील. याशिवाय जीडीपीत तेज रिकव्हरीचे संकेत मिळत आहेत.

सरकार दावा करत आहे की चालू आर्थिक वर्षात जीडीपी ग्रोथ डबल डिजिट राहू शकतो. आरबीआयने जीडीपी ग्रोथचे लक्ष्य 9.5% ठेवले आहे.

2. रिटेल गुंतवणुकदारांचा वाढता विश्वास (Retail Investor) :

भारतात सुमारे 4 कोटी डिमॅट खाती उघडली गेली आहेत. मागील दोन वर्षात सर्वात जास्त रिटले गुंतवणुकदार बाजारात उतरले आहेत.

3. कंपन्यांची चांगली कामगिरी :

सरकारचा FDI वर फोकस आहे. जेव्हा परदेशी गुंतवणूक येईल तेव्हा प्रत्येक सेक्टरमध्ये प्रगती शक्य आहे. कंपन्यांना अनेक सवलती दिल्या जात आहेत.

4. शेयर बाजार रेकॉर्ड हायवर :

कोरोनाच्या पहिल्या लाटेत निफ्टी मार्च-2020 मध्ये घसरून 7300 अंकावर पोहचला होता, परंतु तोच 18 हजार अंकाला स्पर्श करण्यात यशस्वी झाला आहे. या पाठीमागे कंपन्यांच्या चांगल्या कामगिरीचे मोठे कारण आहे.

5. पाच ट्रिलियन इकॉनॉमीचे लक्ष्य :

मोदी सरकारने (Modi Government) 2025 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेला 5 ट्रिलियन डॉलरचा आकार देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. (Rakesh Jhunjhunwala)

हे देखील वाचा

Pune Crime | ED ने जप्त केलेल्या बिल्डर डी. एस. कुलकर्णी (DSK) यांच्या 40 हजार चौरस फुटातील ‘सील’बंद बंगल्यात चोरी; प्रचंड खळबळ

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Rakesh Jhunjhunwala | rakesh jhunjhunwala bullish for indian economy and stock market

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update