Rakesh Jhunjhunwala | राकेश झुनझुनवाला यांनी ‘या’ स्टॉकमधून कमावले 1600 कोटी रुपये, तुमच्याकडे आहेत का?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Rakesh Jhunjhunwala | टाटा समूहाच्या शेयरने (TATA Share) मागील काही सत्रामधील तेजीमुळे शेयरधारकांना शानदार रिटर्न दिला आहे. टाटा मोटर्सच्या शेयरची किंमत 52-आठवड्याच्या नवीन स्तरावर पोहचली. तर टायटन (Titan) कंपनीचे शेयर ऑल टाइम हायवर आहेत. टायटन कंपनीचे शेयर 2021 च्या सुरूवातीपासून उच्च स्तरावर आहेत. ऑक्टोबर 2021 च्या 9 व्यवहारांच्या सत्रांमध्ये टायटनच्या शेयरची किंमत जवळपास 17.50 टक्के वाढली, ज्यामुळे राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांना जवळपास 1600 कोटी रुपयांची कमाई झाली.

 

टायटन कंपनीच्या शेयरच्या प्राईस हिस्ट्री
ऑक्टोबर 2021 मध्ये टायटनच्या शेयरची किंमत 2161.85 रुपयांवरून (एनएसईवर 30 सप्टेंबर 2021 ला बंद किंमत) वाढून 2540 रुपये (एनएसईवर 13 ऑक्टोबर 2021 ला बंद किंमत) झाली आहे.

 

मागील 9 व्यवहाराच्या सत्रात 378.15 रुपये प्रति शेयरची वाढ झाली. या रॅलीमध्ये टायटनच्या शेयरची किंमत 2,608.95 रुपयांच्या आपल्या नवीन ऑल टाइम हायवर पोहचली.

 

या शेयरने राकेश झुनझुनवाला केली इतकी कमाई
टायटन कंपनीच्या एप्रिलपासून जून 2021 तिमाहीच्या शेयर होल्डिंग पॅटर्ननुसार, राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांची टाटा समुहाच्या या कंपनीमध्ये भागीदारी आहे.

राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांच्याकडे कंपनीचे 3,30,10,395 शेयर आहेत
तर त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे 96,40,575 शेयर आहेत. एकुण मिळून 4,26,50,970 टायटनचे शेयर आहेत.

 

मागील 9 सत्रात टायटनच्या शेयरची किंमत 378.15 रुपये प्रति शेयर वाढली यातून
राकेश झुनझुनवाला यांची संपत्ती 1600 कोटी रुपये (378.15 x 4,26,50,970) च्या जवळपास वाढली आहे.

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे.
येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे.
गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Rakesh Jhunjhunwala | rakesh jhunjhunwala earn 1600 crore rupees from this stock in 9 days

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gold Price Today | दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सोनं खरेदीसाठी ग्राहकांमध्ये मोठा उत्साह, जाणून घ्या आजचे दर

Dangerous Apps | विना परवानगी फोनमध्ये स्वताच इन्स्टॉल होताहेत काही अ‍ॅप, धोक्यात प्रायव्हसी; ‘या’ पध्दतीनं करा बचाव

Kolhapur Crime | मुंबई पोलीस दलातील पोलिसाने केले अल्पवयीन मुलीवर अत्याचार, इयत्ता 10 वी ची मुलगी गरोदर राहिल्याने प्रकार उघडकीस