Rakesh Jhunjhunwala | ‘बीग बुल ऑफ इंडिया’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या राकेश झुनझुनवाला यांनी केवळ 5000 रुपयांच्या गुंतवणुकीवरुन केली होती सुरुवात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शेअर मार्केटमधील (Share Market) बीग बुल (Big Bull) म्हणून ओळख असलेले राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचे वयाच्या ६२ व्या वर्षी निधन (Rakesh Jhunjhunwala Passed Away) झाले. त्यांनी केवळ ५ हजार रुपये गुंतवून शेअर मार्केटमध्ये प्रवेश केला होता. विशेष म्हणजे त्यावेळी त्यांच्या वडिलांनी त्यांना पैसे देण्यास नकार दिला होता. आज त्यांची ५.५ अब्ज संपत्ती आहे. ते भारतातील ३६ वे सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून गणले जात होते. ते ‘‘बीग बुल ऑफ इंडिया (Big Bull of India)’’ आणि ‘‘किंग ऑफ बुल मार्केट (King Of Bull Market)’’ म्हणून ओळखले जात.

 

राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचा जन्म ५ जुलै १९६० रोजी एका राजस्थानी कुटुंबात झाला. त्यांचे वडिल आयकर आयुक्त (Commissioner of Income Tax) होते. त्यांनी सिडनहॅम कॉलेजमधून (Sydenham College) पदवी घेतली. त्यानंतर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडियामध्ये (Institute of Chartered Accountants of India) प्रवेश घेतला. कॉलेजमध्ये असताना त्यांनी वडिल शेअर मार्केटविषयी चर्चा करताना ऐकले. ती चर्चा ऐकून त्यांना शेअर मार्केटमध्ये रुची निर्माण झाली. त्यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करण्यासाठी वडिलांकडे पैसे मागितले. तेव्हा त्यांनी नकार दिला आणि मित्रांकडूनही पैसे घेऊ नको. तुझ्या कमाईतील पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतव, असा सल्ला दिला. तेव्हा त्यांनी बचत करुन ५ हजार रुपये जमविले व ते पैसे शेअर मार्केटमध्ये १९८५ मध्ये गुंतवणुक (Investment) केली.

 

त्यांना शेअर मार्केटमध्ये पहिला नफा ५ लाख रुपयांचा होता. १९८६ ते १९८९ दरम्यान त्यांनी जवळपास २० ते २५ लाख रुपयांचा नफा कमावला. त्यांची सर्वात मोठी गुंतवणुक टायटन कंपनीत (Titan Company) तब्बल ७ हजार २९४ कोटी रुपयांची आहे.

सक्रिय गुंतवणूकदार असण्यासोबतच झुनझुनवाला हे अ‍ॅपटेक लिमिटेड (Aptech Limited)
आणि हंगामा डिजिटल मीडिया एंटरटेनमेंट प्रा. (Hungama Digital Media Entertainment Pvt.) चे अध्यक्ष होते.
प्राइम फोकस लिमिटेड (Prime Focus Limited), जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस (Geojit Financial Services),
बिलकेअर लिमिटेड (Bilcare Limited), प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड (Praj Industries Limited),
प्रोव्होग इंडिया लिमिटेड (Provogue India Limited), कॉन्कॉर्ड बायोटेक लिमिटेड (Concord Biotech Limited),
इनोव्हासिंथ टेक्नॉलॉजीज (आय) लिमिटेड (Innovasynth Technologies (I) Limited),
मिड डे मल्टीमीडिया लिमिटेड (Mid Day Multimedia Limited), नागार्जुन कन्स्ट्रक्शन लिमिटेड (Nagarjuna Construction Limited), कंपनीच्या संचालक मंडळावर ते होते.

 

फेक स्टीव्ह जॉब्स ब्लॉग (Fake Steve Jobs Blog) प्रमाणे राकेश झुनझुनवाला यांचा द सिक्रेट जर्नल (The Secret Journal) या नावाचा एक लोकप्रिय विडंबन ब्लॉग आहे.
त्यात गुंतवणुकदारांच्या जीवनावर विनोदी पद्धतीने विडंबन ते करीत असत.
आदित्य मंगल (Aditya Mangal) यांच्या स्कॅम १९९२ या वेबसीरीजमध्ये अभिनेता केविन दवे (Actor Kevin Dave)
याने झुनझुनवाला यांच्यावर आधारित भूमिका साकारली होती.

 

इनसाइडर ट्रेडिंग केल्याप्रकरणी २८ जानेवारी २०२० मध्ये त्यांची चौकशी करण्यात आली होती.
झुनझुनवाला व त्यांच्या असोशिएटने ३५ कोटी रुपये भरल्यानंतर सेबीने हा प्रश्न निकाली काढला होता.

 

Web Title : –  Rakesh Jhunjhunwala | Rakesh Jhunjhunwala known as the Big Bull of India started with an investment of just Rs 5000

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा