Rakesh Jhunjhunwala | राकेश झुनझुनवाला यांनी ‘या’ स्टॉकमधून 1 आठवड्यात गमावले 753 कोटी रुपये; तुम्ही तर घेतला नाही ना?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Rakesh Jhunjhunwala | शुक्रवारी शेयर बाजार (Stock Market) मध्ये घसरणीमुळे किरकोळ गुंतवणुकदारांचे मोठे नुकसान झाले. गुंतवणुकदारांसाठी आठवड्याचा शेवटचा व्यवहाराचा दिवस ब्लॅक फ्रायडे (Black Friday) ठरला. (Rakesh Jhunjhunwala)

 

आठवड्यात 7 टक्केपेक्षा जास्त घसरण
शेयर बाजारातील बिग बुल राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांच्या पसंतीच्या टायटन कंपनीचा शेयर शुक्रवारी जवळपास 4.37 टक्के घसरला. जर या संपूर्ण आठवड्याबाबत बोलायचे तर हा शेयर जवळपास 7 टक्केपेक्षा जास्त घसरला.

 

एकुण संपत्तीमध्ये घट
टायटन कंपनीच्या शेयरच्या किमतीत (titan company share price) या घसरणीमुळे राकेश झुनझुनवाला यांच्या एकुण संपत्तीमध्ये घसरण झाली आहे. बिग बुल झुनझुनवाला यांचे जवळपास 753 कोटी रुपयांचे नुकसान झाले.

 

टायटन कंपनीची शेयर हिस्ट्री
राकेश झुनझुनवाला यांच्या शेयरची किंमत जवळपास 2374 रुपयांवरून घसरून 2293 रुपये प्रति शेयरच्या स्तरावर आली. मागील एका आठवड्यात, टायटन कंपनीचा शेयर 2467 रुपयांनी घसरून 2293 रुपयांवर आला.

या कालावधीमध्ये 174 रुपये प्रति शेयर किंवा जवळपास 7 टक्के तोटा झाला.

राकेश झुनझुनवाला यांचे टायटन कंपनीत होल्डिंग
जुलैपासून सप्टेंबर 2021 तिमाहीसाठी टायटन कंपनीच्या शेयरधारक पॅटर्ननुसार, राकेश झुनझुनवाला आणि त्यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला (Rekha Jhunjhunwala) यांची टाटा समुहाच्या या कंपनीत भागीदारी आहे.

 

झुनझुनवाला दाम्पत्याचे इतके आहे शेयर्स
(Rakesh Jhunjhunwala) यांच्याकडे टायटन कंपनीचे 3,37,60,395 शेयर आहेत, जे कंपनीच्या एकुण लावलेल्या भांडवलाच्या 3.80 टक्के आहे. तर रेखा झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे 95,40,575 शेयर किंवा 1.07 टक्के शेयर आहेत.

 

राकेश झुनझुनवाला आणि रेखा झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे 4,33,00,970 शेयर म्हणजे 4.87 टक्के भागीदारी आहे.

 

राकेश झुनझुनवाला यांच्या एकूण संपत्तीमध्ये घसरण
टायटन कंपनीच्या शेयरच्या किंमतीत या आठवड्यात 174 रुपयांचा लॉस झाला. टायटन कंपनीच्या शेयरमध्ये झालेल्या या घसरणीमुळे राकेश झुनझुनवाला यांचा निव्वळ तोटा जवळपास रू. 753 कोटी (रू. 174 x 43300970) आहे.

 

Web Title :- Rakesh Jhunjhunwala | rakesh jhunjhunwala lost rupees 753 crore this week in tata stock check details

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune News | वारकर्‍यांच्या दिंडीला झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू; 20 जखमी, मावळ तालुक्यातील साते फाट्यावरील घटना

Thackeray Government | ठाकरे सरकारकडून कोविडने मृत्यू पावलेल्यांच्या नातेवाईकांना 50 हजारांची मदत ! ‘ही’ कागदपत्रे बंधनकारक; जाणून घ्या नियम व अटी

Punit Balan Group | पहिल्या ‘पुनित बालन करंडक’ अजिंक्यपद 14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा; हेरंब क्रिकेट अ‍ॅकॅडमी, ब्रिलीयंट्स स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी संघांचा सलग दुसरा विजय !