Rakesh Jhunjhunwala | राकेश झुनझुनवाला यांच्या निधनाचा पोर्टफोलिओवर परिणाम, खुले होताच कोसळले ‘हे’ स्टॉक्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांच्या आकस्मिक निधनानंतर (Rakesh Jhunjhunwala Death) त्यांच्या पोर्टफोलिओमधील बहुतांश शेअर मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारात घसरले. Aptech Ltd मध्ये सर्वात मोठी घसरण दिसून आली. सुरुवातीच्या व्यवहारात तो सुमारे 5 टक्क्यांनी घसरला. Star Health च्या शेअरमध्येही (Share Market) घट झाली. राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये एकूण 32 शेअर होते. राकेश झुनझुनवाला यांनी टायटन कंपनीमध्ये सर्वाधिक गुंतवणूक केली होती, आज सुरुवातीच्या व्यवहारात त्या शेअरमध्ये (Stock Market) 1.54 टक्क्यांची घसरण झाली. टायटन कंपनीचा शेअर्स बीएसई सेन्सेक्सवर रु. 2,433 वर व्यवहार करत होता. (Rakesh Jhunjhunwala)

 

टायटनमध्ये मोठी गुंतवणूक

जून तिमाहीच्या शेवटी, झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा यांच्याकडे टायटनमधील 5.10 टक्के भागीदारीसह 11,086.9 कोटी रुपयांचे शेअर्स होते. 12 ऑगस्ट रोजी टायटनचा शेअर 0.01 टक्क्यांनी वाढून 2,471.95 रुपयांवर बंद झाला होता आणि फर्मचे मार्केट कॅप 2.19 लाख कोटी रुपये होते.

राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा यांच्याकडे भारतातील मल्टी-ब्रँड फुटवेअर रिटेल चेनमध्ये 3,348.8 कोटी रुपयांचे शेअर्स आहेत. जून तिमाहीच्या अखेरीस त्यांनी या फर्ममध्ये 14.40 टक्के भागीदारी घेतली होती. Aptech Ltd मध्ये बिग बुलची 23.40 टक्के भागीदारी होती किंवा क्यू 1 मध्ये 225 कोटी रुपयांची गुंतवणूक होती, हा शेअर आज बीएसईवर 3.67 टक्क्यांनी घसरून 224.20 रुपयांवर व्यवहार करत होता. (Rakesh Jhunjhunwala)

 

स्टार हेल्थच्या शेअरमध्ये मोठी घसरण

स्टार हेल्थ इन्शुरन्सच्या शेअरमध्येही घसरण झाली. शेवटच्या व्यवहाराच्या दिवसाच्या बंद किमतीच्या तुलनेत आज हा शेअर एक टक्क्याने घसरला. सुरुवातीच्या व्यवहारात तो 662.75 रुपयांवर व्यवहार करत होता, तो 696.10 रुपयांवर बंद झाला. आज तो 660 रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. राकेश झुनझुनवाला हे स्टार हेल्थचे प्रमोटर होते. 12 ऑगस्ट रोजी शेअर 0.40 टक्क्यांनी वाढून 696.10 रुपयांवर बंद झाला.

 

क्रिसिलचे शेअरही घसरले

क्रिसिल लिमिटेडचा शेअर बीएसईवर 3261.60 रुपयांच्या मागील बंदच्या तुलनेत 0.56 टक्क्यांनी घसरून 3,243 रुपयांवर आला. झुनझुनवाला यांनी जून तिमाहीत क्रेडिट रेटिंग फर्ममध्ये 1,301.9 कोटी रुपयांची भागीदारी होती. 12 ऑगस्ट रोजी हा शेअर 1.30 टक्क्यांनी घसरून 3,261.60 रुपयांवर बंद झाला. Metro Brands मध्येही 0.5 टक्क्यांची घसरण झाली.

 

किती केली आहे गुंतवणूक

राकेश झुनझुनवाला यांनी 32 कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली होती. 12 ऑगस्टपर्यंतच्या आकडेवारीनुसार या कंपन्यांमधील त्यांच्या शेअरची एकूण किंमत 32,000 कोटी रुपये होती. राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओ (Rakesh Jhunjhunwala Portfolio) बद्दल सांगायचे तर, त्यांनी स्वत: ची फर्म Rare Enterprises स्थापन केली आणि त्याद्वारे अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली.

 

टाटा कंपनीच्या शेअर्सनी बनवले ’बिग बुल’

राकेश झुनझुनवाला यांना ’बिग बुल’ बनवण्यात टाटा ग्रुपच्या कंपनीच्या शेअर्सचा मोठा वाटा होता,
ज्यांनी 1985 मध्ये शेअर बाजारात (Stock Market) गुंतवणूक करण्यास सुरुवात केली.
त्यांनी प्रथम टाटा टी (Tata Tea) चे 5000 शेअर्स 43 रुपये प्रति शेअर या दराने खरेदी केले.
अवघ्या तीन महिन्यांतच शेअरचा भाव 43 रुपयांवरून 143 रुपयांवर पोहोचला होता.
यानंतर त्यांनी 2002-03 मध्ये टायटनचे शेअर्स सरासरी फक्त 3 रुपये किमतीत खरेदी केले.
सध्या, टायटन स्टॉक्स (Titan Stocks) ची किंमत 2,400 रुपयांपेक्षा जास्त आहे.

 

Web Title : – Rakesh Jhunjhunwala | rakesh jhunjhunwala owned shares fall after his death aptech star health major losers

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा