Rakesh Jhunjhunwala | बिगबुलने ‘या’ कंपनीत कमी केली 10% भागीदारी, केवळ 2 दिवसात विकले 8.5 लाख शेयर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Rakesh Jhunjhunwala | दिग्गज गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांनी टेक्सटाइल कंपनी मंधाना रिटेल व्हेन्चर्स (Mandhana Retail Ventures) मधील सुमारे 10 टक्केची भागीदारी कमी केली आहे. बिगबुल नावाने प्रसिद्ध राकेश झुनझुनवाला यांनी एक्सचेंजला सांगितले की, त्यांनी टेक्सटाइल कंपनी मंधाना व्हेन्चेर्समधील आपली भागीदारी 12.74 टक्केने (जून तिमाहीच्या शेयर होल्डिंगनुसार) कमी करून 2.40 टक्के केली आहे.

झुनझुनवाला यांनी गुरुवारी 7 ऑक्टोबरला एक्सचेंजला याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, त्यांच्याकडे मंधाना रिटेलचे आता 5,30,500 शेयर आहेत, जे अगोदर 28,13,274 किंवा कंपनीच्या एकुण जारी शेयरच्या 12.74 टक्के होते. मागील दोन दिवसात त्यांनी मंधाना रिटेलचे सुमारे 8.5 लाख शेयर विकले आहेत.

झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांनी एक्सचेंजला सांगितले की,
मी 27 सप्टेंबरपासून 4 ऑक्टोबर 2021 च्या दरम्यान मंधारा रिटेलचे 4,05,200 शेयर विकले,
जे कंपनीच्या एकुण जारी शेरच्या 1.8349 टक्के आहेत. तर 5 ऑक्टोबरपासून 7 ऑक्टोबरदरम्यान मी कंपनीचे 8,52,200 इक्विटी शेयर विकले आहेत.

राकेश झुनझुनवाला यांनी या टेक्सटाइल कंपनीत जुलैपासून सप्टेंबर 2021 च्या दरम्यान लागोपाठ आपली भागीदारी कमी केली आहे.
17 सप्टेंबर 2021 ला सुद्धा त्यांनी मंधाना रिटेल 65,820 शेयर विकले होते, तर 20 सप्टेंबर 2021 ला त्यांनी कंपीचे 32,274 शेयर विकले होते.

 

 

मंधाना रिटेल व्हेन्चर्स लिमिटेडचे शेयर शुक्रवारी एनएसईवर 4.42 टक्केने घसररून 14.05 रुपयांच्या भावावर बंद झाले.
मागील एक महिन्यात या शेयरच्या भावात 6.64 टक्केची घसरण झाली आहे.
मात्र, मागील एक वर्षाच्या कालावधीत कंपनीने आपल्या शेयर हॉल्डरला 56.11 टक्केचा रिटर्न दिला आहे.

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे.
येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे.
गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
www.policenama.com
कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

Web Title :- Rakesh Jhunjhunwala | rakesh jhunjhunwala portfolio big bull brings down stake to 24 percent in mandhana retail

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | नवरात्रीनिमित्त महिलांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन, 210 महिलांची तपासणी

Pune News | दसरा व दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फेरीवाल्यांवरील अतिक्रमण कारवाई थांबवावी; शहर फेरीवाला समितीची मागणी

Pune Police Crime Branch | पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिकाला IT च्या चौकशीची धमकी, प्रकरण मिटवण्यासाठी 50 लाखाची खंडणी मागणाऱ्याला गुन्हे शाखेकडून अटक