Rakesh Jhunjhunwala | राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलियोमध्येही ‘हा’ 100 रुपयांचा स्टॉक, एक्सपर्ट देत आहेत खरेदी करण्याचा सल्ला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Rakesh Jhunjhunwala | या वर्षी अ‍ॅल्युमिनियम (Aluminium Price) आणि इतर धातुच्या किंमती विक्रमी स्तरावर पोहचल्याने आणि भारत सरकारने अ‍ॅल्युमिनियमवर 5 टक्के डंपिंग विरोधी शुल्क (anti dumping duty) लावल्याने शेयर बाजारातील तज्ज्ञ मेटल स्टॉक कंपन्यांकडून मजबूतीची अपेक्षा करत आहेत. (Rakesh Jhunjhunwala)

 

मार्केट एक्सपर्ट ज्या कंपन्यांच्या स्टॉकमध्ये तेजीची अपेक्षा करत आहेत त्यांच्यात नॅशनल अ‍ॅल्युमिनियम कंपनी लिमिटेड म्हणजे नाल्को (NALCO) चा समावेश आहे. जाणकारांनुसार, नाल्कोचे शेयर फंडामेंटल आणि टेक्निकल, दोन्ही दृष्टीने मजबूत दिसत आहेत.

 

राकेश झुनझुनवाला यांच्याकडे अडीच कोटी शेयर
मार्केट एक्सपर्ट गुंतवणुकदारांना राकेश झुनझुनवाला यांचा हा शेयर (Rakesh Jhunjhunwala stock) 3 महिन्यासाठी 137 रुपयांच्या लक्ष्यावर 95 ते 100 रुपयात खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत.

 

नाल्कोच्या शेयर होल्डिंग पॅटर्ननुसार (NALCO shareholding pattern) राकेश झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे 2.5 कोटी शेयर आहेत. (Rakesh Jhunjhunwala)

 

मार्केट एक्सपर्ट म्हणतात की, अ‍ॅल्युमिनियम आणि इतर धातुच्या किमती मागील एक वर्षात विक्रमी उच्च स्तरावर पोहचल्या आहेत आणि भविष्यात त्या खाली येण्याची शक्यता नाही. यासाठी बाजार या स्टॉकद्वारे चांगल्या रिटर्नची अपेक्षा करत आहे.

चांगला ट्रॅक रेकॉर्ड
नाल्कोचा स्टॉक यावेळी 100 रुपयांच्या जवळपास ट्रेड करत आहे. त्याचा एक महिन्याचा ट्रॅक पाहिला तर नोव्हेंबरच्या अंतिम आठवड्यात हा स्टॉक 88 रुपयांवर होता. एका महिन्याच्या प्रवासात नाल्कोचा शेयर 103 रुपयांच्या स्तरावर पोहचला आहे. ऑक्टोबरमध्ये हा स्टॉक 121 च्या विक्रमी उंचीवर पोहचला होता.

 

नाल्कोवर चांगल्या रिटर्नच्या अपेक्षांचे कारण तज्ज्ञ सांगतात की, कंपनी आपल्या कर्जावर सुद्धा नियंत्रण मिळवण्यात यशस्वी झाली आहे.
यासाठी हा एक गुणवत्तेचा स्टॉक आहे, ज्याचा कुणीही आपल्या पोर्टफोलियो समावेश करू शकतो.

 

मात्र, हा एक पीएसयू स्टॉक आहे आणि यासाठी याच्यातून खुप जास्त अपेक्षा करता येणार नाही.
पुढील 3 महिन्यात तो 130 ते 135 पर्यंत जाण्याची अपेक्षा केली जाऊ शकते.

 

कोणत्या स्तरावर करावी खरेदी
एक्सपर्ट सांगतात की, सरकारने अ‍ॅल्युमिनियम आणि इतर धातुंवर 5 टक्के डंपिंग विरोधी शुल्क लावले आहे,
ज्यामधून धातु कंपन्यांच्या गुंतवणुकदारांचे मनोबल वाढत आहे.

 

कारण नाल्को कमी किंमतीवर एक क्वालिटी पीएसयू स्टॉक आहे.
यासाठी नाल्कोच्या 137 रुपये प्रति स्टॉक स्तराच्या लक्ष्यासाठी 95 ते 100 प्रति शेयर स्तरवर खरेदी केली जाऊ शकते.

 

Web Title :- Rakesh Jhunjhunwala | rakesh jhunjhunwala portfolio share market experts nalco stock price today

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Second Hand iPhone-Smartphone | जर खरेदी करणार असाल सेकंड हँड iphone आणि स्मार्टफोन तर अशी चेक करा सर्व्हिस हिस्ट्री आणि रिपेरिंग डिटेल; जाणून घ्या

Pune Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील ‘या’ भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार

OBC Reservation Maharashtra | ‘ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नको’ !सत्ताधारी-विरोधक एकत्र, विधिमंडळात एकमताने ठराव मंजूर