Rakesh Jhunjhunwala | ‘बक्कळ’ कमाईनंतर राकेश झुनझुनवाला यांनी ‘या’ स्टॉकमधून गुंतवणूक काढली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Rakesh Jhunjhunwala | भारतीय शेअर व्यापारी आणि गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचा पोर्टफोलिओ शेअर मार्केट (Portfolio Stock Market) गुंतवणूकदारांसाठी अधिक उत्सुकतेची बाब असते. दरम्यान झुनझुनवाला हे कोणते स्टॉक आपल्या पोर्टफोलिओमध्ये जोडतात. अथवा कोणत्या स्टॉकमधून गुंतवणूक काढून घेत असतात. याच्याकडे किरकोळ गुंतवणूकदारांचे (Retail Investors) लक्ष केंद्रीत असते. दरम्यान नव्या माहितीनूसार, वोकेशनल ट्रेनिंग सर्विसे प्रोवाइडर Aptech च्या शेअरची राकेश झुनझुनवाला यांनी विक्री केली आहे. तर हा स्टाॅक त्यांच्यासाठी मल्टीबॅगर ठरला (Multibagger Stock) होता. Aptech च्या स्टॉकने गेल्या वर्षात 190 टक्क्यांचा रिटर्न दिला गेला आहे.

 

डिसेंबर महिन्याच्या तिमाहीच्या होल़्डिंगनुसार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांच्याकडे आता Aptech ची 23.4 टक्क्यांची पार्टनरशीप आहे.
त्यामुळे सध्या त्यांच्याकडे कंपनीचे 9668840 शेअर आहेत.
ज्यांचा दर 415 कोटी इतकी आहे. त्याआगोदरच्या सप्टेंबर महिन्याच्या तिंमाहीत राकेश झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीची 23.8 टक्के इतकी हिस्सेदारी होती.
Aptech चा स्टॉक लॉन्ग टर्म आणि शॉर्ट टर्ममध्ये मल्टीबॅगर (Multibagger) ठरला आहे.
गेल्या एका वर्षामध्ये Aptech च्या स्टॉकने 190 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे.

 

या दरम्यान, शेअरची किंमत 147 रुपयांनी वाढून 426 रुपये इतका झाला आहे. त्याचबरोबर मागील पाच वर्षामध्ये शेअरने 125 टक्के रिटर्न दिला आहे. सहा महिन्यांचा परतावा साधारण दहा टक्के इतका राहिला आहे.

 

Web Title :-  Rakesh Jhunjhunwala | rakesh jhunjhunwala sell stake in aptech in december quarter this multibagger stock has given 190 percent return in 1 year

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा