Rakesh Jhunjhunwala | राकेश झुनझुनवाला यांच्या अकासा एयरमध्ये (Akasa Air) फ्लाईट बुकिंग सुरू, पहिले उड्डाण 7 ऑगस्टला होणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Rakesh Jhunjhunwala | आकासा एअर (Akasa Air) च्या उड्डाणाची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. कंपनीने आजपासून फ्लाईटचे बुकिंग सुरू केले आहे. शेअर बाजारातील (stock market) दिग्गज राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांनी गुंतवलेले आकासाचे पहिले उड्डाण 7 ऑगस्ट रोजी होणार आहे. बोईंग 737 मॅक्स (Boeing 737 MAX) विमानासह पहिले उड्डाण मुंबई-अहमदाबाद मार्गावर असेल.

 

अकासा एअरने शुक्रवारी एक निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे. कंपनीने म्हटले आहे की, आम्ही 28 फ्लाईटची तिकिटे विकण्यास सुरुवात केली आहे. 7 ऑगस्टपासून मुंबई-अहमदाबाद मार्गावर आणि 13 ऑगस्टपासून बेंगळुरू-कोची मार्गावर विमानसेवा सुरू होत आहे.

 

दर महिन्याला दोन नवीन विमाने
आकासा एअरचे सह-संस्थापक आणि मुख्य व्यावसाय अधिकारी प्रवीण अय्यर म्हणाले, आम्ही मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान नवीन बोईंग 737 मॅक्स विमानाने ऑपरेशन सुरू करत आहोत. आम्ही आमच्या नेटवर्क विस्तार योजनेवर टप्प्याटप्प्याने काम करू. हळूहळू आम्ही नवीन शहरे जोडू. आम्ही आमच्या ताफ्यात दर महिन्याला दोन नवीन विमानांचा समावेश करण्याच्या योजनेसह पुढे जात आहोत. (Rakesh Jhunjhunwala)

 

एव्हिएशन रेग्युलेटर डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) ने 7 जुलै रोजी आकासा एअरला एअर ऑपरेटर सर्टिफिकेट (AOC) दिले.
कंपनीला मागील वर्षी डीजीसीएकडून हिरवा झेंडा मिळाल्यानंतर अकासा एयरने 26 नोव्हेंबरला बोईंगसह 72 मॅक्स विमाने खरेदी करण्याचा करार केला होता.

वेगाने नवीन खरेदी
एकीकडे कंपनी आपले कामकाज सुरू करणार असताना दुसरीकडे क्रू मेंबर्सची नियुक्तीही जोरात सुरू आहे.
गेल्या आठवड्यात एका ट्विटमध्ये, कंपनीने एअरलाइन क्षेत्राशी संबंधित अधिकाधिक लोकांना अकासामध्ये अर्ज करण्यास सांगितले होते.
तुम्ही कंपनीच्या वेबसाइटवर नवीन भरतीशी संबंधित पोस्ट देखील पाहू शकता.

 

Web Title :- Rakesh Jhunjhunwala | rakesh jhunjhunwalas flight booking starts in akasa air the first flight will be on august 7

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Weight Loss Ayurveda Tips | लठ्ठपणा कंट्रोल करण्यासाठी आयुर्वेदाचा आधार, जाणून घ्या कोणत्या गोष्टी खाल्याने कमी होते वजन

 

Pune Crime | सराफी दुकानातून 2 कोटी 60 लाखांचे 5 किलो सोन्याची बिस्किटे चोरुन नेणारी महिला गजाआड

 

CBSE 12th Result | सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; असा पाहा निकाल