गुलशन कुमारवर पिस्तूल रोखून मारेकरी म्हणाला – ‘खुप झाली पूजा, आता वर जाऊन कर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  – मुंबईचे माजी पोलीस कमिश्नर राकेश मारिया यांनी गुलशन कुमार हत्याकांडाबाबत खळबळजनक खुलासे केले आहेत. राकेश मारिया यांनी आपले पुस्तक लेट मी से इट नाऊमध्ये लिहिले आहे की, क्राईम ब्रांचला अगोदरच गुलशन कुमार यांच्या हत्येच्या प्लॅनबाबत माहिती मिळाली होती.

राकेश मारिया यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे की, 22 एप्रिल 1997 ला एका खबरीचा त्यांना फोन आला होता. त्या खबरीने सांगितले, गुलशन कुमारच्या हत्येचा प्लॅन बनवला आहे. यापाठीमागे कोण आहे, असे विचारल्यानंतर तो म्हणाला – अबू सालेम. खबरीने सांगितले होते की, शिव मंदिरात जाताना त्यांची हत्या करण्यात येणार आहे. गुलशन कुमार दररोज शिव मंदिरात जाऊन पूजा करत असत. राकेश मारिया यांच्या या दाव्याने गुलशन कुमार हत्याकांडाच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत.

कॅसेट किंग नावाने प्रसिद्ध टी सीरीज कंपनीचे मालक गुलशन कुमार यांची कहानी चित्रपटापेक्षा कमी नाही. गुलशन कुमार यांचा संगीत किंवा बिझनेसशी काहीही संबंध नव्हता. एक वेळ अशी होती, जेव्हा ते आपल्या वडीलांसोबत दिल्लीच्या दरियागंजमध्ये ज्यूसचे दुकान चालवत होते. त्यांचे नशीब अचानक बदलले. नशीबाने त्यांना ज्यूस मेकरपासून कॅसेट किंग बनवले. 80 च्या दशकात त्यांनी टी सीरीजची स्थापना केली आणि 90 च्या दशकात ते कॅसेट किंग नावाने प्रसिद्ध झाले होते. टी सीरीज करोड़ो रूपयांची कंपनी झाली होती.

वैष्णोदेवीच्या भक्ताची मंदिराबाहेरच झाली हत्या
गुलशन कुमार वैष्णो देवीचे भक्त होते. वैष्णो देवीवर त्यांची मोठी श्रद्धा होती. त्यांनी वैष्णो देवीच्या भक्तांसाठी अनेक सुविधा दिल्या होत्या. याशिवाय ते रोज पश्चिम मुंबईच्या अंधेरी भागातील जीतनगरच्या जीतेश्वर महादेव मंदिरात जात असत. 12 ऑगस्ट 1997 ला सकाळी ठिक आठ वाजता गुलशन कुमार पूजा करण्यासाठी मंदिरात पोहचले होते. मृत्यूपूर्वी गुलशन कुमार यांनी सकाळी सात वाजता एका प्रोड्यूसरला फोन केला होता. त्यांनी म्हटले होते की, एक सिंगर आणि नंतर एका मित्राला भेटल्यानंतर ते मंदिरात जाणार आहेत. यानंतर तुम्हाला भेटतो. गुलशन कुमार यांच्या या कॉलनंतर 3 तासात वृत्त आले की जीतेश्वर महादेव मंदिराच्या बाहेर त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येने बॉलीवुडमध्ये खळबळ उडाली.

गुलशन कुमार यांना मारल्या 16 गोळ्या
कॅसेट किंग गुलशन कुमार यांना मारेकर्‍यांनी 16 गोळ्या मारल्या होत्या. सुमारे साडेदहा वाजले होते. गुलशन कुमार मंदिरातून पूजा करून बाहेर पडत होते. तेव्हा त्यांना अचानक त्यांच्या पाठीवर बंदूक ठेवल्याचे जाणवले. त्यांनी समोर एका व्यक्तीला पाहिले, ज्याच्या हातात बंदूक होती.

गुलशन कुमार यांनी समोरच्या व्यक्तीला विचारले, हे का करत आहेस. त्याने उत्तर दिले, खुप पूजा केली, आता वर जाऊन कर. यानंतर गुलशन कुमार यांना काही कळण्याच्या आतच त्याने फायरिंग सुरू केली.

बंदूकीतून त्याने 16 राउंड फायर केले. त्यांची मान आणि पाठीवर 16 गोळ्या लागल्या होत्या. वाचण्यासाठी ते आजूबाजूच्या घरांचे दरवाजे ठोठावत होते. परंतु, कुणीही दरवाजा उघडला नाही. त्यावेळी गुलशन कुमार यांच्या सोबत केवळ त्यांचा ड्रायव्हर होता. ड्रायव्हरने मालकाला वाचविण्यासाठी मारेकर्‍यांवर कलश फेकण्यास सुरूवात केली. परंतु, मारेकरी गोळ्या मारतच राहिले. त्यांनी ड्रायव्हरच्या पायावरसुद्धा गोळी मारली, ज्यामुळे तो जखमी झाला.

गुलशन कुमार यांची हत्या आणि सुरक्षा
गुलशन कुमार यांना सुरक्षा देण्यात आली होती. परंतु, त्यांनी मुंबई पोलिसांऐवजी यूपी पोलिसांकडून सुरक्षा घेतली होती. ज्या दिवशी गुलशन कुमार यांची हत्या झाली त्या दिवशी त्यांचा बॉडीगार्ड आजारी होता. यासाठी तो त्यांच्या सोबत गेला नाही. मारिया यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे की, क्राइम ब्रांचने त्यांना सुरक्षा दिली होती, परंतु युपी पोलिसांनी त्यांना कमांडो सुरक्षा दिल्याने मुंबई क्राइम ब्रांचने आपली सुरक्षा परत घेतली.

कुणी केली गुलशन कुमारची हत्या
गुलशन कुमारच्या हत्येमध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि अबू सालेमचे नाव घेतले जाते. असे म्हटले जाते की, दाऊद इब्राहिमने गुलशन कुमार यांच्याकडे 10 करोडची खंडणी मागितली होती. गुलशन कुमार यांनी ही रक्कम देण्यास नकार दिला होता. त्यांनी म्हटले होते की, पैसे त्याला (दाऊद) देण्यापेक्षा त्या पैशातून वैष्णो देवीमध्ये भंडारा करणे पसंत करेन. यानंतरच त्यांची हत्या करण्यात आली.

माहितीनुसार अबू सालेमच्या सांगण्यावरून दोन शार्प शूटर दाऊद मर्चेंट आणि विनोद जगतापने गुलशन कुमार यांची हत्या केली होती. 9 जानेवारी 2001 ला विनोद जगतापने कुबूल केले की त्याने गुलशन कुमार यांना गोळ्या घातल्या. त्यानंतर 2002 ला त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. दाऊद मर्चेंटला सुद्धा या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली.

गुलशन कुमार हत्याकांडाचे अनेक पैलू
या प्रकरणात मुंबई पोलिसांनी एक आरोपी नदीमलाही बनवले होते. मुंबई पोलिसांनी आपल्या तपासानंतर म्हटले होते की, फिल्मी जगतातील काही लोक आणि काही माफिया गुलशन कुमार यांच्या हत्येला जबाबदार होते. हत्येचा आरोप फिल्म संगीतकार नदीम सैफीवर सुद्धा लावण्यात आला होता. वैयक्तिक शत्रूत्वामुळे त्याने दाऊद आणि अबू सालेमला पैसे देऊन हत्या केली. हत्येच्यावेळी नदीम लंडनमध्ये होता. केसमध्ये नाव आल्यानंतर तो लंडनवरून परतला नाही. परंतु, नंतर पोलिस नदीमवर हत्येचा गुन्हा सिद्ध करू शकल नाहीत.