‘अजमल कसाब’ही एकदा म्हणाला होता – ‘भारत माता की जय’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – तत्कालीन पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या ‘लेट मी से इट नाऊ’ या पुस्तकाचे प्रकाशन झाल्यापासून अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत. याच पुस्तकात त्यांनी मोठा खुलासा केला आहे. 26/11 च्या मुंबई हल्ल्यात जिवंत पकडलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाबला चौकशी दरम्यान पहाटे साडेचार वाजता रुग्णालयातून गुन्हे शाखेच्या कार्यालयात नेण्यात आले. त्यावेळी राकेश मारीया यांनी ताफ्यातील सर्व गाड्यांना थांबवलं आणि कसाबला बाहेर काढला. त्याला गुडघ्यावर बसवून जमिनीला डोकं टेकवून ‘भारत माता की जय’ असं म्हणायला सांगितले.

पहिल्यांदा कसाबने हळू आवाजात ‘भारत माता’ बोलला. मात्र, त्यानंतर राकेश मारियांनी त्याला मोठ्या आवाजात म्हणण्यासाठी दटावलं आणि सांगितले की सगळ्यांना ऐकायला जाईल असं मोठ्याने बोल. त्यानंतर कसाबने मोठ्या आवाजात भारत माता की जय म्हटल्याचे राकेश मारीया यांनी त्यांच्या पुस्तकात नमूद केले आहे.

दशतवाद्यांना शेवटी मुंबई पोलीसांचा खांदा
या पुस्तकात राकेश मारीया यांनी आणखी एक खुलासा केला आहे. 26/11 च्या हल्ल्यावेळी मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना मुंबई पोलीसांनी कशा प्रकारे धार्मिक रिवाजाप्रमाणे अज्ञातस्थळी दफन केलं. मारीया लिहतात, मारले गेलेल्या दहशतवाद्यांना मुंबई पोलीसांनी खांदा दिला आणि एका मौलवीला बोलावून दफनविधी पार पाडला. पाकिस्तानने आपल्या नागरिकांना ओळखायला नकार दिला तर दुसरीकडे मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचा दफनविधी मुंबई पोलीस पार पडत होते. शेवटी दहशतवाद्यांना मुंबई पोलिसांनीच खांदा दिला.