कॅन्सर सर्जरीनंतर राकेश रोशन दिसले कुटुंबासोबत

मुंबई : वृत्तसंस्था – राकेश रोशन यांना थ्रोट कॅन्सर झाला आहे या आजाराचा खुलासा काही दिवसापूर्वी हृतिक रोशन यांने स्वतः केला होता. हे समजल्यावर राकेश रोशन यांच्या चाहत्यांना धक्का बसला होता. आता राकेश रोशन यांच्यावरील पहिली शस्त्रक्रिया यशस्वी ठरली असून शस्त्रक्रियेनंतर त्यांनी आपल्या तब्येती विषयी माहिती दिली आहे .
शस्त्रक्रियेनंतर मी एकदम ठीक आहे आणि लवकरच घरी जाईल, असे राकेश रोशन यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितले. सर्जरीनंतरचा त्यांचा पहिला फोटोही सोशल मीडियावर शेअर केला गेला. या फोटोत राकेश रोशन आपल्या कुटुंबासोबत दिसत आहेत. फोटोत राकेश रोशन यांच्या नाकात नळी लागलेली दिसतेय.
काल हृतिक रोशन याचा वाढदिवस होता. हृतिकने आपला वाढदिवस पापा राकेश रोशन यांच्यासोबत रूग्णालयात साजरा केला. या सेलिब्रेशनचा एक फोटोही हृतिकने शेअर केला.‘ते उठून उभे झालेत. ही प्रेमाची शक्ती आहे. आजचा दिवस खूप चांगला होता,’ असे हा फोटो शेअर करताना हृतिकने लिहिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अद्याप राकेश रोशन यांना रूग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला नाही.