Rakhi Sawant | अखेर आदिलने पोस्ट शेअर करत राखीबरोबर लग्नाचा केला खुलासा; म्हणाला ‘मी राखीशी लग्न केले नाही असे…’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होती. तिने काही दिवसांपूर्वीच दुसऱ्यांदा विवाहबद्ध झाल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर केली होती. राखीने बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानीबरोबर निगाह केल्याचे बोलले जात आहे. सात महिन्यांपूर्वीच दोघांनी निगाह केल्याचे सांगितले आहे. लग्नाचे फोटो देखील राखीने (Rakhi Sawant) शेअर केले होते. आता आदिलने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

 

एका आठवडापूर्वीच राखी सावंतने आदिल दुर्रानीबरोबर लग्न केल्याची घोषणा करत त्यांच्या लग्नाचे फोटोज शेअर केले होते. यावर आदिल खानला विचारले असता त्याने उत्तर देण्यास टाळाटाळ केली होती. अखेर त्याने या लग्नाची कबुली देत इंस्टाग्राम वर त्यांच्या लग्नाचा एक फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटले की, “अखेर आता मी एक मोठी घोषणा करत आहे. मी राखीशी लग्न केले नाही असे कधीच म्हटले नव्हते. पण मला काही गोष्टी हाताळायच्या असल्याने मी शांत होतो. राखी आपल्या सुखी वैवाहिक जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा (पप्पुडी)”.

https://www.instagram.com/p/CndxwmIJU40/?utm_source=ig_web_copy_link

राखीनंतर (Rakhi Sawant) आदिलने पोस्ट शेअर करत त्यांच्या लग्नाची बातमी दिल्याने चाहते त्यांना कमेंट करून शुभेच्छा देत आहेत.
तर राखीने सात महिन्यापूर्वीच आदिलशी निगाह केला आहे. या दोघांनी 29 मे 2022 ला निगाह केले असून 2 जुलै रोजी त्यांनी लग्नाचे रजिस्ट्रेशन केले आहे.
राखीने यापूर्वी एनआरआय असणाऱ्या रितेश बरोबर लग्न केले होते. दोघेही बिग बॉस मध्ये झळकले देखील होते.
पण 2022 मध्ये त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राखी आणि आदिल
यांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती.

 

Web Title :- Rakhi Sawant | adil khan durrani confirms marriage with rakhi sawant share instagram post

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime News | खाणीत पडून 21 वर्षीय तरुणीच्या मृत्यू प्रकरणातील आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

Nashik Graduate Constituency Election | नॉट रिचेबल असलेल्या शुभांगी पाटील माध्यमांसमोर येताच म्हणाल्या…

Kirit Somaiya | हसन मुश्रीफ यांच्याबाबतची ‘ती’ भूमिका चंद्रकांतदादा पाटील यांनीच स्पष्ट करावी – किरीट सोमय्या