Rakhi Sawant | घटस्फोटानंतर राखी सावंतला करायचंय ‘या’ क्रिकेटरशी दुसरं लग्न

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. बिग बॉसच्या (Big Boss) 15 व्या पर्वात राखी सावंतने (Rakhi Sawant) पति रितेश (Husband Riteish) याची ओळख करुन दिली होती. मात्र राखी सावंतनं वाइल्ड कार्ड एंट्री (Wild Card Entry) केली होती. शोमधून बाहेर आल्यानंतर राखी आणि रितेश यांना अनेकवेळा एकत्र दिसून आले. परंतु व्हॅलेंटाइन डेच्या (Valentine Day) अगोदर दोघेही वेगळ झाल्याचे समोर आले. राखी सावंतने इन्स्टाग्रामवर (Instagram) एक पोस्ट लिहून याची माहिती दिली होती. रितेश पासून वेगळं झाल्यानंतर काही दिवसातच राखीने दुसरं लग्न (Second Marriage) करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एवढंच नाही तर तिला एका क्रिकेटरसोबत (Cricketer) लग्न करायचे असल्याचे तिने सांगितले.

 

एका मुलाखतीत राखी सावंत (Rakhi Sawant) हिने तिच्या दुसऱ्या लग्नाचा प्लॅन शेअर केला. तसेच तिच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक समस्येसाठी ती स्वत:च जबाबदार असल्याचे सांगितले. राखी म्हणाली, मी रितेशला बळजबरीनं किस केलं होतं. तो खूपच लाजरा आहे. त्यामुळे मी यात पुढाकार घेतला. माझ्या घटस्फोटासाठी (Divorce) मी स्वत:जबाबदार आहे. या सर्व गोष्टींमध्ये त्याची काहीही चूक नसल्याचे राखीने सांगितले.

 

क्रिकेटरसोबत लग्न करण्याची इच्छा
याच मुलाखतीमध्ये राखीने पुढच्या नियोजनाबाबत सांगितले. ती म्हणाली, माझ्या वडिलांना माझे लग्न एका पोलीस अधिकाऱ्यासोबत (Police Officer) व्हावे असे वाटत होते. मात्र मला एका क्रिकेटरशी लग्न व्हावं अशी माझी इच्छा आहे. मग मी देखील आयपीएलमध्ये (IPL) जाऊ शकेन स्टेडियममधून आपल्या पतीला चौकार-षटकार मारताना पाहून त्याला सपोर्ट करेन. तसेच तिने तिचा पती अनेक कायदेशीर बाबींमध्ये फसलेला असल्यानं आम्ही दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचे मुलाखतीदरम्यान सांगितले.

 

नातं वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र…
राखीने काही दिवसांपूर्वी तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये तिने तिच्या घटस्फोटाची माहिती दिली होती.
या पोस्टमध्ये तिनं पती रितेशपासून वेगळं होत असल्याचे म्हटलं होतं. बिग बॉस 15 मधून बाहेर आल्यानंतर बरंच काही घडलं.
आम्ही आमचं नातं वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला मात्र आम्हाला यामध्ये अपयश आलं. अखेर आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचे पोस्टमध्ये म्हटलं होतं.


Web Title :- 
Rakhi Sawant | after divorce with ritesh rakhi sawant wants to marry with cricketer

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

K Chandrashekar Rao | तेलंगणाचे मुख्यमंत्री KCR आणि CM उद्धव ठाकरे यांच्यात ‘चाय पे चर्चा’, भाजप विरोधी तिसऱ्या आघाडीचे संकेत

 

Bharatiya Mazdoor Sangh | असंघटित, कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय मजदूर संघ रस्त्यावर उतरणार. संघाची पुणे जिल्हा अधिवेशनात घोषणा

 

Pimpri Corona Update | मोठा दिलासा ! पिंपरी चिंचवडमध्ये दैनंदिन रुग्णसंख्या शंभरच्या आत, जाणून घ्या इतर आकडेवारी