बिग बॉस १३ मध्ये राखी सावंत आणि दीपक कलाल दिसणार..

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ड्रामा क्वीन राखी सावंत तिच्या हॉटनेसमुळे नेहमी चर्चेत असते. सध्या अशी माहिती समोर आली आहे की राखी सावंत आणि दीपक कलाल ‘बिग बॉस’ १३ मध्ये दिसून येणार आहे. या माहितीनंतर कंट्रोवर्सियल क्वीन राखी परत एकदा चर्चेत आली आहे. राखीने इंस्टाग्राम अकाउंटवर दीपक कलाल सोबत एक फोटो शेयर केला आहे. तिने पोस्टच्या माध्यमातून अशी माहिती दिली आहे की ते दोघे पॉपुलर रिएलिटी शो बिग बॉस १३ चा हिस्सा बनणार आहेत. राखीने सलमान खान आणि कलर्स चॅनेलचे आभार मानले आहेत. तिने लिहिले आहे की सलमान खान आणि कलर्सला धन्यवाद.

दीपक कलालने सुद्धा सेम हाच फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून शेअर केला आहे. त्याने, इनवाइट केल्याबद्दल सलमान खान आणि चॅनेलचे आभार मानले. त्याने पुढे असेही लिहिले आहे की बिग बॉस हाउस मध्ये माझी लाईव्ह सुहागरात होईल. तुम्ही एक्साइटेड आहेत ? राखीने आणि दिपकने शेअर केलेल्या पोस्टला सर्व लोक गंमत म्हणून बघत आहेत. त्या दोघांनी चुकीचे हॅशटॅग वापरले आहे. आणि त्या पोस्ट मध्ये दोघांनी सलमान खान आणि बिग बॉसची स्पेलिंग चुकीची लिहिली आहे. बिग बॉसचा १३ वा सीजन २९ सप्टेंबरला सुरु होणार आहे. रिपोर्ट्सच्या अहवालानुसार करण पटेल, जरीन खान आणि अंकिता लोखंडेला बिग बॉस १३ साठी ऑफर केली आहे.