Birthday SPL : ‘शेजारचे लोक फेकायचे त्यातून उचलून जेवण केलंय’; राखी सावंतनं सांगितलं दु:ख

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) नेहमीच आपल्या उलटसुलटच वक्तव्यानं चर्चेत येत असते. याशिवाय वादग्रस्त वक्तव्ये, बोल्ड फोटो आणि व्हिडिओ हेही तिच्या चर्चेत राहण्याचं एक कारण आहे. विशेष म्हणजे असं उलटं पालटं करून ती स्वत:ला नेहमीच चर्चेत ठेवू पाहत असते. आज (दि. 25 नोव्हेंबर राेजी) राखी सावंत तिचा वाढदिवस साजरा करत आहे. राखी लहानपणी खूप हलाखीच्या दिवसांतून गेली आहे, जे खूप कमी लोकांना माहीत आहे.

एका शोमध्ये बोलताना राखीनं तिच्या लहानपणाबद्दल सांगितलं होतं. राखीनं कोणत्या गोष्टींचा सामना केला होता हेही तिनं सांगितलं होतं. राखीचं खरं नाव नीरू भेडा (Neeru Bheda) आहे.

राखीनं तिच्या लहानपणाबद्दल बोलताना सांगितलं की, मी खूप गरिबी पाहिली आहे. मी पोटात असताना आई दगड-विटांवर जेवण बनवायची. मी खूप गरीब कुटुंबातून आहे.

राखी पुढे म्हणते, आई सांगते मी लहान होते तेव्हा आमच्याकडे जेवण नव्हतं. शेजारचे लोक जेवण फेकायचे त्यातून उचलून जेवण करायचे. माझी आई हॉस्पिटलमध्ये आया होती. मुश्किलीनं जेवण मिळत होतं.

राखी म्हणते, मी मोठी झाल्यानंतर आईला म्हणायचे मला शाळेत जायचंय. आई म्हणते असे जाऊयात. मला माझी हिस्ट्री सांगायला चांगलं नाही वाटत, असंही राखी म्हणाली होती. या शोमध्ये तिनं तिच्या करिअरमधील काही अनुभवदेखील शेअर केले होते.

You might also like