Rakhi Sawant on Baba Ramdev | कोरोना अन् रामदेव बाबा सारखेच (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडची ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणामुळे सतत चर्चेत असते. त्यासाठी ती सतत काहीना काही करत असते. तसेच ती सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव असते. तिने पोस्ट केलेले सर्वच व्हिडिओ नेहमीच चर्चेत येतात. आता राखी(Rakhi Sawant)ने कोरोनाची तुलना ही योगगुरु रामदेव बाबा यांच्याशी केली आहे. राखीचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर केला आहे.

राखीने पोल्का डॉटचा काळ्या रंगाचा टॉप परिधान केला आहे.
अरे देवा, हा कोरोना आहे ना…कोरोना म्हणजे एकदम बाबा रामदेव यांच्यासारखा आहे.
कोरोना कधी येतो, कधी लपतो तर कधी बाहेर निघून जातो, असे राखी म्हणाली.
राखीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून योगगुरु रामदेव बाबा देखील चर्चेत आहेत. कोरोनाच्या उपचार पध्दतीतील अ‍ॅलोपथी औषधांविरुद्ध वक्तव्य केल्याचा आणि पतंजलीच्या कोरोनिल किटमुळे कोरोना बरा होतो असा दावा त्यांनी केला होता. त्यामुळे डॉक्टरांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान यापूर्वी राखी एका रस्त्यावरच्या माणसाला फटकारल्यामुळे चर्चेत आली होती.

काका तुम्ही जा. मी मुलाखत देत आहे. तुम्ही काय बघतं आहात? मुलगी कधी बघितली नाही का? पुढे जाना, असे राखी बोलते. त्यानंतर ते काका राखीकडे बघत तिथून दुचकी घेऊन निघाले आणि त्यांचा अपघात होणार तेवढ्यात राखी म्हणाली, माझ्याकडे नाही तिकडे बघा नाही तर अपघात होईल तुमचा. राखीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

हे देखील वाचा

Good News For Youth | हुशार युवकांना पैसे कमविण्याची सुवर्णसंधी ! मोदी सरकारकडून महिन्याला 50 हजार मिळू शकतात, जाणून घ्या

Pune Fire | एसव्हीएस ॲक्वा टेक्नॉलॉजीसमध्ये 4 वर्ष सुरू होते शासनाच्या परवानगी शिवाय उत्पादन; कंपनीचा मालक निकुंज शहा याला 13 जूनपर्यंत पोलिस कोठडी

Former CM Kamal Nath | काँग्रेस नेते कमलनाथ यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल

Pune Crime News | दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या 4 जणांच्या टोळीला खडक पोलिसांकडून अटक

RBI ने केला नाही व्याजदरात बदल, जाणून घ्या कुठे FD केल्याने मिळेल जास्त फायदा

Pune Crime News | मोक्का कारवाई नंतर गायब झालेला सराईत गुन्हेगार सुलतान उर्फ टिप्या पोलिसांच्या जाळयात, उस्मानाबाद जिल्हयातून अटक

Devendra Fadnavis | ‘विषय राज्याच्या हाती, पाठपुरावा मात्र केंद्राकडे’