‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतची PM मोदींकडे ‘विचित्र’ मागणी, म्हणाली…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंतनं पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे वेगळीच मागणी केली आहे. आपल्या या विचित्र मागणीमुळं राखी सावंत पुन्हा चर्चेत आली आहे. राखी सावंत चर्चेत येणं यात नवीन काहीच नाही. अनेकदा ती वादग्रस्त विधान करत असते आणि सर्वांचं लक्ष वेधून घेत असते.

नुकताच राखीचा वाढदिवस झाला. तिनं मोठ्या उत्साहात आपला वाढिदवस साजरा केला. यावेळी राखीनं एक पत्रकार परिषदही घेतली. यावेळी तिनं मोदींकडे एक विचित्र मागणी केली. राखीनं चक्क तिला पाकिस्तान हवा असल्याचं म्हटलं होतं. राखीच्या या वक्तव्यानं सध्या ती चर्चेचा हिस्सा बनताना दिसत आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना राखी सावंत म्हणाली, “माझी फक्त एकच मागणी आहे ती म्हणजे ज्याप्रकारे मोदींनी काश्मीरवर विजय मिळवला आहे त्याचप्रमाणे त्यांनी पाकिस्तानवर विजय मिळवावा.” राखीनं याआधीही अनेकदा मोदींबद्दल भाष्य केलं आहे. पत्रकार परिषदेत बोलताना राखीनं मोदींच्या नावानं नारेबाजीही केली.

https://www.instagram.com/p/BzifU0lBdas/

https://www.instagram.com/p/BstXjBzBVkQ/

https://www.instagram.com/p/BstXXvRBqQx/

https://www.instagram.com/p/BzDEoH-Ba80/

Visit : Policenama.com