कंफर्म ! राखी सावंतने दिली ‘त्या’ एनआरआय मुलासोबत लग्न केल्याची ‘कबुली’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री राखी सावंतने अखेर आपल्या लग्नाची कबुली दिली आहे. नुकतेच राखीच्या वधुच्या लुकमधील काही फोटो व्हायरल झाले होते. यानंतर तिने सांगितले होते की, हे फोटो लग्नाचे नसून ब्राईडल फोटोशुटचे आहे. यानंतर इंटरनेटवर हनीमूनचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राखीने कंफर्म केलं की, तिचं लग्न झालं आहे. नुकताच राखीने हा खुलासा केला आहे.

‘मी खूप घाबरले होते’

राखी स्पॉटबॉय वेबसाईटशी बोलताना म्हणाली की, “मी खूप घाबरले होते. होय मी लग्न केलं आहे. माझ्या पतीचं नाव रितेश आहे आणि तो युकेमध्ये आहे. लग्न करून तो परत गेला आहे. माझा व्हिसा आल्यानंतर मी त्याच्याकडे जाणार आहे. मी माझं इंडियातील काम सुरुच ठेवणार आहे. येथे येणं जाणं सुरुच असेल. मला टीव्ही शो प्रोड्युस करायचा आहे. आता माझं स्वप्न पूर्ण होणार आहे. एवढा चांगला नवरा दिल्याबद्दल मी येशूचे आभार मानते.”

https://www.instagram.com/p/B0wJOvbnrTS/

दीड वर्षांपूर्वी झाली होती ओळख

राखीने सांगितले की, दीड वर्षांपूर्वी रितेशने तिला एका मुलाखतीत पाहिल्यानंतर मेसेज केला होता. राखी म्हणाली की, “तो तेव्हाच माझा चाहता झाला. आमचं मेसेजवर बोलणं व्हायला लागलं. आम्ही चांगली मैत्री झाली. नंतर हे नातं आणखीच वाढत गेलं. आम्ही प्रेमात पडलो. अखेर आम्ही विवाहबद्ध झालो आहोत.”

राखी आपल्या वक्तव्यांमुळे आणि वाकड्या तिकड्या हरकतींमुळे नेहमीच चर्चेचा हिस्सा बनलेली असते. अनेकदा ती तिच्या एखाद्या फोटो किंवा व्हिडीओमुळेदेखील चर्चेत आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –