राखी सावंतच्या बोल्ड सीनमुळे नवरा वैतागला, प्रेग्नेंसीवर देखील केला खुलासा

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत मागील काही महिन्यांपासून दावा करत आहे की तिने एका NRI बिजनेसमॅनबरोबर लग्न केले आहे. परंतू तिचा पती कधीही कॅमेऱ्यासमोर आला नाही, त्यामुळे तिच्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही. परंतू आता खुद्द राखीच्या पतीनेच मुलाखत देत आपल्या पर्सनल लाइफसंबंधित प्रश्नांची उत्तरे दिली.
rakhi sawant
राखीच्या पतीने रितेशने त्यांचे अस्तित्व, स्वभाव, कॅमेरासमोर न येण्याचे कारण तसेच आपल्या स्वभावाबद्दल आणि राखीच्या प्रेग्नेसी बद्दल अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. राखीचा मागील काही दिवसांपासून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात तिने प्रेग्नेंट असल्याची घोषणा केली. आता तिच्या पतीने मुलाखतीत सांगितले की राखी खोटे सांगत आहे. परंतू लवकरच ती प्रेग्नेंट होईल, आणि मला वाटते की आम्हाला दोन मुले होतील. पहिली मुलगी आणि दुसरा मुलगा.
Rakhi Sawant
मागील काही दिवसांपासून एक फनी व्हिडिओ शेअर होत आहे. ज्यात राखी सांगते की जानू मी आई बनणार आहे, यानंतर एका पुरुषाचा आवाज ऐकायला येतो. तो व्यक्ती म्हणतो, असे कसे होऊ शकते मी तर इंग्लंड मध्ये होतो. राखीच्या पतीने मुलाखतीत सांगितले की, मी खूप साधा सरळ माणूस आहे, जो सकाळी 9 वाजता ऑफिसला जातो आणि संध्याकाळी 6 वाजता घरी येतो. मला माहिती आहे की जेव्हा राखीने आमच्या लग्नाची घोषणा केली तेव्हा अनेक लोकांना वाटले की मी अस्तित्वातच नाही.
Rakhi Sawant
राकेशने कॅमेरा समोर न येण्याचे कारण सांगताना सांगितले की शेवटी मी कॅमेरा समोर का यायला हवे. त्यामुळे त्याला काय मिळणार आहे. रितेशने सांगितले की मी तिला कोणते कपडे घाल याबद्दल कधी काही सांगत नाही. ना की तिचे कपडे निवडतो. राकेशने सांगितले की आमचे उत्तम सुरु आहे, राखी कॅमेरासमोर एक वेगळ्या प्रकारची व्यक्ती असेल परंतू ती मनाने खूप चांगली व्यक्ती आहे.

 

Visit : Policenama.com