‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत म्हणाली – ‘माझ्या शरीराला बॉम्ब लावून मला चीनला सोडा, मला देशासाठी मरायचंय’ ! ट्रोलर्स म्हणाले… (व्हिडीओ)

पोलिसनामा ऑनलाइन – बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत नेहमीच आपल्या उलट सुलटच वक्तव्यानं चर्चेत येत असते. वादग्रस्त वक्तव्ये, बोल्ड फोटो आणि व्हिडीओ यांमुळे नेहमी ती चर्चेतत असते आणि विशेष म्हणजे असं काही करून ती स्वत:ला नेहमीच चर्चेत ठेवू पाहत असते. नुकताच तिनं एक व्हिडीओ शेअर केला होता ज्यात तिनं काही वादग्रस्त वक्तव्ये केली होती. सुशांत सिंह राजपूत तिच्या स्वप्नात आला होता आणि माझ्या पोटी तो जन्म घेणार आहे असा दावा तिनं केला होता. राखीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्यानं व्हायरल झाला होता. राखीनं आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात तिनं मरण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ज्यानंतर राखी पुन्हा एकदा ट्रोल होत आहे.

राखीनं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती सांगत आहे की, चायनाच्या कुत्र्यांनो आमची बॉर्डर सोडून पळून जावा. चाहत्यांनो प्लिज मोदींना सांगून शरीराला बॉम्ब लावून मला चायनाला पाठवा. मी चीनला उध्वस्त करेन. मला माझ्या देशासाठी मरायचं आहे.” या व्हिडीओत राखी आणखीही बरंच काही बोलत आहे.

राखीचा व्हिडिओ समोर आल्यानतंर राखी पुन्हा एकदा प्रचंड ट्रोल होताना दिसत आहे. एकानं तिला कमेंट करत सांगितलं की, ही फालतू कामं सोडून काहीतरी चांगलं काम कर. अनेक युजर्सनं वेगवेगळ्या कमेंट करत तिला ट्रोल केलं आहे.