कंगना रनौतवर भडकली राखी सावंत, म्हणाली – ‘बॉलीवूडला वाईट बोलू नकोस’

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : कंगना रनौत आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात झालेल्या संघर्षात देशभरातून लोक प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. अशा परिस्थितीत बॉलिवूड सेलिब्रिटीही दोघांमध्ये विभागले गेले आहेत. एका बाजूला कमल आर खानने कंगनाला पाठिंबा दर्शविला आहे, तर दुसरीकडे आता राखी सावंतने व्हिडीओ बनवून कंगनाला चांगलेच फटकारले आहे. राखीने व्हिडिओमध्ये कंगनाला खूप वाईट म्हटले आहे आणि मुंबईबद्दल वाईट बोलून मग ती परत का आली असा सवाल केला आहे.

व्हिडिओमध्ये राखी म्हणते- कंगना मुंबईत का आलीस परत ? आमच्या दहशतवाद्यांच्या शहरात का आली? आम्ही सर्व बॉलिवूडमध्ये दहशतवादी आहोत. तू बॉलिवूडला शिव्या देत होतीस तर मग इथे का आलीस ? मी संपूर्ण बॉलिवूडला सांगते कि कंगनाला बॉयकॉट करा. आमच्या बॉलिवूड मुंबईतून पैसे कमावले आणि मग तिथे बसूनच धमक्या देते. नार्को टेस्ट वाल्ल्यांना मी म्हणते तुम्ही कंगनाची टेस्ट करा. मी म्हणते की, जगातील सर्व लोकांनी कंगनाकडे काम मागावे. हे त्यांचे प्रॉडक्शन हाऊस आहे जे बाहेरील लोकांना काम देईल.

राखी पुढे म्हणाली- तुम्ही आदरणीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि निर्माता करण जोहर यांना आरोपाच्या चौकटीत उभे केले. तू सुद्धा तिथेच आहे मॅडम. बॉलिवूडमध्ये बरेच लोक छोट्या शहरांमधून आले आणि मोठे स्टार झाले, त्यामुळे बॉलिवूडबद्दल वाईट बोलू नका. मला जगातील लोकांना सांगायचे आहे की आज आपण कंगनाला पाठिंबा देत आहात. उद्या पहा असे होणार नाही.

दरम्यान, 9 सप्टेंबर रोजी बीएमसीने कंगना रनौतच्या कार्यालयावर बुलडोजर चालविला. वाय प्लस कॅटेगरी सिक्युरिटीसह अभिनेत्री मुंबईत आली. जेव्हापासून कंगनाच्या कार्यालयाची तोडफोड झाली, तेव्हापासून असंख्य लोक कंगनाच्या समर्थनार्थ पुढे येत असल्याचे दिसून येत आहे. रस्त्यावर बीएमसीविरोधात घोषणाबाजी केली जात आहे. मात्र, राखी सावंतला कंगनाची चर्चा अजिबात आवडली नाही. महाराष्ट्र सरकारबद्दल बोलायचे झाल्यास त्यांची वृत्तीही कंगनाच्या विरोधात कमी होण्याचे नाव घेत नाही. आता कंगनावरही असे आरोप केले जात आहे की, तिचेही ड्रग्ज कनेक्शन आहे आणि त्याचा तपास केला जाईल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like