राखीचा नवा ‘ड्रामा’, चक्क पाकिस्तानी झेंड्यासोबत फोटो ; नक्की काय आहे ‘मॅटर’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि कृत्यांमुळे राखी सावंत अनेकवेळा चर्चेत असते. आता राखी पुन्हा एकदा नव्या व्हिडीओ आणि फोटोमुळे चर्चेत आली आहे. तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात ती चक्क पाकिस्तानी झेंड्यासोबत दिसत आहे. तिचा हा फोटो पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे सोशल मिडीवर सध्या तिच्या या फोटोची मोठी चर्चा सुरु आहे.

 

राखीच्या फोटोचा नक्की मॅटर काय ?

राखीचा हा फोटो पाहून सोशल मीडियावर अनेक लोक संतापले. मात्र, राखीने या फोटोसोबत दिलेले कॅप्शन वाचल्यानंतर त्यांना त्या फोटोमागील सत्यही समजले. राखी सावंतने आपला हा फोटो शेअर करताना लिहिले आहे, “मला माझा भारत देश खूप आवडतो. मात्र, हा फोटो माझा आगामी चित्रपट ‘धारा 370’ मधील आहे. हा पाकिस्तानचा सेट आहे. या चित्रपटात कलम 370 विषयी आणि काश्मीरच्या पंडितांवर मांडणी करण्यात आली आहे.”

काय आहे राखीची पोस्ट

“मी या चित्रपटात एका पाकिस्तानी मुलीची भूमिका करत आहे. ज्या दहशतवादी संघटना लहान मुलांना जिहादी बनवण्याचे काम करतात, त्यांचा भांडाफोड करण्याचे काम माझी भूमिका करते”, असेही राखीने व्हिडिओमध्ये सांगितले.

View this post on Instagram

Im jast plying my character in the film 🎥

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

 

व्हिडीओवरून पाकिस्तानी तरुणीचा संताप

राखीच्या या व्हिडीओवरून पाकिस्तानमधील तरुणीने आक्षेप घेतला आहे. याबाबत संबरीना खमीसा ही तरुणी म्हणाली, “तुम्ही आमची संस्कृती काय हे ठरवू शकत नाही. पाकिस्तान इस्लामचे अनुकरण करतो. इस्लाम अत्यंत पवित्र आणि शांततावादी धर्म आहे. मला पाकिस्तानवर अभिमान आहे. तसेच माझे माझ्या संस्कृतीवर प्रेम आहे.” राखी सावंतने देखील या तरुणीला उत्तर दिले आहे. राखी म्हणाली, “हा माझा चित्रपट आहे. तुला तो चांगला वाटत नसेल, तर तू माझ्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवरुन निघून जाऊ शकते.” असे राखीने तिला उत्तर दिले आहे.

Loading...
You might also like