Rakhi Sawant | राखी सावंतने टॉयलेटमधील व्हिडीओ केला शेअर

पोलीसनामा ऑनलाईन : Rakhi Sawant | अभिनेत्री राखी सावंत नेहमीच तिच्या वक्तव्यामुळे त्याच बरोबर तिच्या अतरंगी वागण्यामुळे चर्चेत असते. ती नेहमीच अनेक विचित्र फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून सर्वांचेच लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असते. तर सध्या राखी सावंत दुबईमध्ये फिल्मफेअर कार्यक्रमासाठी तिचा बॉयफ्रेंड आदिल खान बरोबर गेली आहे. मात्र यावेळी तिने एक विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमुळे नेटकऱ्यांनी तिला चांगलेच ट्रोल केले आहे. (Rakhi Sawant)

दुबईतील एका हॉटेलच्या टॉयलेट मध्ये राखीने हा शूट केल्याचा दिसत आहे. या व्हिडिओतून ती दुबईतील एका हॉटेलमधील सोनेरी रंगाच्या टॉयलेटची झलक तिच्या चाहत्यांना दाखवत आहे. हे सगळे पाहून अक्षरशः तिला वेड लागले असे ती वागताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. एवढेच नाही तर सोनेरी टॉयलेट दाखवण्याच्या नादात तिने ते कसे वापरायचे याची कृती देखील करून दाखवली. या व्हिडिओमध्ये ती शेवटी जाताना ती हे देखील म्हणते “आज रात्री सगळे झोपल्यावर मी हे सगळं चोरी करणार”. (Rakhi Sawant)

राखीचा हा व्हिडिओ सध्या चर्चेत तर आहेच परंतू अनेक नेटकरी मात्र हा व्हिडिओ पाहून संतापले आहेत. काहींनी कमेंट करून “राखी तू चेहऱ्यावरून चोर दिसत आहेस”. तर एकाने “राखी पहिल्यांदा दुबईला गेली आहेस का?” तर एका नेटकऱ्यांनी “आपल्या सर्वांची इज्जत काढत आहे ही. तिला दुबईला का घेऊन गेलात” असेही कमेंट करत आहेत. आता या सगळ्या कमेंट वर राखी काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Web Title :- Rakhi Sawant | rakhi sawant shared video of golden toilet in dubai

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shinde-Fadnavis Govt | शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार हिवाळी अधिवेशनापूर्वी

Pune Crime | माझी बायको होशील का? 13 वर्षाच्या मुलीसाठी 14 वर्षाच्या मुलाचे इंस्टाग्राम स्टेटस; हडपसर परिसरातील नामांकित शाळेतील प्रकार