Rakhi Sawant | 2 वर्षानंतर भेटलेल्या पतीसोबत राखी सावंत Bigg Boss मध्येच करणार ‘सुहागरात’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Rakhi Sawant | टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध शो ‘बिग बॉस’ दिवसेंदिवस प्रेक्षकांना आवडत चालला आहे. तर ‘Bigg Boss 15’मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री घेऊन (Rashmi Desai) रश्मी देसाई, (Devoleena Bhattacharya) देवोलीना भट्टाचार्य आणि राखी सावंत पुनरागमन करणार आहेत. (Rakhi Sawant) संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये ‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी राखी सावंतच्या गुप्त पतीनं ‘बिग बॉस 15’मध्ये धमाकेदार एंट्री मारली आहे.

 

राखी सावंतनं (Rakhi Sawant) बऱ्याच वर्षापासून लग्न झालं असल्याचा दावा केला होता. मात्र पतीचं नाव विचारलं असता, राखी विषय टाळत असे. परंतु राखी सावंतच्या पतीनं आता बिग बॉसमध्ये धमाकेदार प्रवेश केला आहे. (Rakhi Sawant Husband) त्यामुळे चहात्यांना राखीचा पती कोण? या प्रश्नाचं उत्तर समोर आलंय. राखी सावंतचा पती म्हणजेच रितेशचा चेहरा पाहण्यासाठी नेटकरीवर्ग आणि चहाते गेल्या 2 वर्षापासून वाट पहात होते. मात्र त्यांची प्रतीक्षा आता संपली आहे.

 

राखीचा पती रितेशनं (Bigg Boss 15)‘बिग बॉस 15’ मध्ये प्रवेश केला होता. तेव्हा राखीनं एका हिंदू पत्नीप्रमाणे त्याच्या पायाला हात लावून नमस्कार केला. त्यांनंदेखील राखी बद्दल प्रेम आणि आदर व्यक्त करण्यसाठी व तिला घट्ट मिठी मारुन गालावर किस केलं. तसेच बिग बॉस मधल्या अनेक स्पर्धकांनी राखी आणि रितेशला त्यांच्या लव स्टोरी बद्दल विचारलं असता, रितेशनं म्हटलं की, “एका इव्हेंटचं आयोजन करत असताना. माझ्या पीएनं राखीचा नंबर दिला. मात्र मी तिला फोन केला नाही.

मी राखीला हाय पाठवलं आणि (Rakhi Sawant) तिने मला ब्लॉक केलं.” तसेच त्यानंतर या दोघांच्या लव स्टोरी बद्दल राखीने देखील त्यांची पहिली भेट व्हाट्सअपवर झाली असल्याचं सांगितले. नंतर रितेशने थोड्या कालावधीनंतर राखीला दुसऱ्या नंबर वरून मेसेज केला, आणि तिनं त्याला उत्तर दिलं. यावर राखी म्हणाली, “मी त्यावेळी दुखी होते. मला एक बॉयफ्रेंड होता. पण मला नंतर कळलं की, माझा बॉयफ्रेंड एक मोठा डॉन आहे, आणि तो सध्या कर्जबाजारी झालाय. त्यामुळं मला माझ्या जीवाची भीती वाटत होती. म्हणून मला लग्न करायचं होतं.

 

दरम्यान, राखीनं स्पर्धकांना रितेश आणि राखी गेल्या दीड वर्षापासून भेटले नाही असं सांगितलं.
कारण रितेश लॉकडाऊनमध्ये परदेशात अडकला, तर राखी बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून होती.
त्यामुळे शो मध्ये राखी आणि रितेशला सगळं सुहाग रातवरून चिडवताना दिसत आहे.
तर असं म्हटलं जातंय की, मोनालिसाच्या लग्न आणि हनिमूनप्रमाणं राखीसोबतही बिग बॉस तसंच काही करेन.

 

Web Title :- Rakhi Sawant | rakhi sawant when blocked ritesh on his 1st phone call will celebrate 1st night in bigg boss 15 house

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Best Life Lnsurance Policy Plans | कोणत्या ‘आयुर्विमा पॉलिसी’चा प्लान तुमच्यासाठी राहील योग्य, जाणून घ्या बेस्ट ‘लाईफ इन्श्युरन्स’ प्लान

Bigg Boss 15 | ‘तेजस्वी’च्या आईला नाही आवडत करण कुंद्रा आणि तेजस्वीची जवळीक; रश्मी देसाईनं केला खुलासा

Disha Patani | बिकिनीवरील हॉट फोटो शेअर करून दिशा पाटनीनं वाढवला सोशल मीडियाचा पारा, चाहत्यांनी ‘स्वर्गपरी’ म्हणून केलं कौतुक