‘सुशांत माझ्यापोटी पुनर्जन्म घेणार’, ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत पुन्हा एकदा बरळली (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत नेहमीच आपल्या उलट सुलटच वक्तव्यानं चर्चेत येत असते. वादग्रस्त वक्तव्ये, बोल्ड फोटो आणि व्हिडीओ यांमुळे नेहमी ती चर्चेतत असते आणि विशेष म्हणजे असं काही करून ती स्वत:ला नेहमीच चर्चेत ठेवू पाहत असते. नुकताच तिनं एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात तिनं काही वादग्रस्त वक्तव्ये कली आहे. सुशांत सिंह राजपूत तिच्या स्वप्नात आला होता आणि माझ्या पोटी तो जन्म घेणार आहे असा दावा तिनं केला आहे. सध्या राखीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्यानं व्हायरल होत आहे.

राखीनं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती सांगत आहे की, मी रात्री झोपलेली असताना सुशांत सिंह राजपूत माझ्या स्वप्नत आला होता. मी तुझ्या पोटी पुनर्जन्म घेणार आहे असं तो मला म्हणाला. मला याचा अर्थ समजला नाही. म्हणून हे कसं शक्य आहे असं मी त्याला विचारलं. यावर सुशांत मला म्हणाला, तू लग्न कर त्यानंतर मी तुझ्यापोटी जन्म घेईन असं त्यानं मला सांगितलं.” असा अजबगजब दावा राखीनं केला आहे.

राखीचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर काहींनी तिला नेहमीप्रमाणं ट्रोल केलं आहे. अनेकांनी तिच्यावर टीक केलीय. तिला परिस्थितीचं भान नाहीये असंच सर्वजण म्हणत आहेत. एकीकडे सुशांतच्या अशा जाण्यानं चाहते दु:खात आहेत आणि अशात राखीनं पुन्हा नव्या वादाला तोंड फोडलं आहे.