राखी सावंतनं शेयर केला ‘व्हिडिओ’, यूजर्स म्हणाले नवऱ्यानं सोडलं की घटस्फोट झाला ? ( व्हिडिओ )

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राखी सावंत आणि वादाचा जवळचा संबंध आहे. सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असलेल्या राखी सावंतच्या प्रत्येक पोस्टवरून ती नेहमीच चर्चेत असते. आता राखीच्या नव्या सोशल मीडिया पोस्टने त्यांच्या लग्नावर प्रश्न उपस्थित केले आहेत. नुकतेच राखीने गुपचूप लग्न केले.

राखी सावंतने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर बरेच व्हिडिओ पोस्ट केले आहेत. सर्व व्हिडिओंमध्ये राखी खूपच खिन्न दिसत आहे. राखीने तिचा एक ब्लॅक अँड व्हाइट व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये ती म्हणत आहे की – ‘अभी तुमको मेरी जरूरत नहीं, बहुत चाहने वाले मिल जाएंगे. ‘

दुसर्‍या व्हिडिओमध्ये राखी रडताना दिसत आहे. राखीच्या व्हिडिओमध्ये सच है कि दिल तो दुखा, हमने मगर सोचा है हे गाणे सुरु आहे.

तर एका व्हिडीओमधील इंतजार करते करते एक और शाम बीत गई, तुम आज भी नहीं आओगे और तन्हाई फिर जीत जाएगी या डायलॉग्सवर ती खूप उदास आणि दु:खी हावभाव करतांना दिसत आहे.

राखीच्या या व्हिडिओंवरून युजर्सनी तिची फिरकी घ्यायला सुरुवात केली आहे. तिच्या व्हिडिओ पोस्टवर कमेंट देताना, एका युजरने म्हंटले आहे की, -नवऱ्याने सोडलं की घटस्फोट झाला ?

आणखी काही यूजर्स विचारत आहे की, रितेशने सोडून दिले की, धोका दिला ?

राखीने नुकतेच मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलात एका एनआरआयशी गुपचूप लग्न केले. आधी तिने ही बातमी नाकारली. माझ्या लग्नाची बातमी खोटी आहे. मी त्या हॉटेलात ब्राईडल फोटोशूटसाठी गेले होते, असे सांगून राखीने नेहमीप्रमाणे ‘ड्रामा’ केला. पण शेवटी लग्न मी लग्न केले, अशी कबुली तिने दिली आहे.

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like