‘त्या’ फोटोमुळे राखी सावंत प्रचंड ट्रोल, युजर्सने केल्या अश्लील कमेंट्स

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नेहमीच काहीतरी वादग्रस्त वक्तव्य करून लक्ष वेधून घेणारी आणि चर्चेत राहणारी अभिनेत्री राखी सावंत पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आल्याचे दिसत आहे. राखी सावंत सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. प्रत्येक गोष्टीवर ती आपले मतही मांडत असते. विषय कोणताही असो मीडियाचे लक्ष कसे खेचून घ्यायचे हे तिला चांगले माहीत आहे.

इमोशनल व्हिडीओनंतर राखीने तिचा एक कार्टून इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यानंतर मात्र युजर्सनी तिची चांगलीच टर उडवली आहे. राखीने तिच्यासारखे दिसणारे दोन कार्टून इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. कदाचित हे कार्टून राखीला तिच्या कोणी फॅनने बनवून दिले आहेत. राखीच्या या फोटोवर तिचे अनेक फॅन्स तऱ्हेतऱ्हेच्या कमेंट करताना दिसत आहेत.

एक युजर म्हणतो की, ये हुई न बात, राखी तुझा खरा चेहराही असाच आहे. तर दुसरा युजर म्हणतो की, एकदम तुझ्यासारखीच डायन दिसत आहे.

आणखी एका युजरने राखीच्या फोटोवर कमेंट करत म्हटले आहे की, मेकअपशिवाय तू अशीच दिसतेस राखी. राखीच्या याच फोटोवर अनेक अश्लील कमेंट्स देखील दिसून आल्या आहेत.

Loading...
You might also like