‘अरुण जेटलींच्या निधनाबद्दल मला 10 दिवसांपूर्वीच माहीत होतं’ : राखी सावंत (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शनिवारी (दि २४ ऑगस्ट) दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ६६व्या वर्षी दीर्घ आजारानं त्यांचं निधन झालं. यानंतर पूर्ण देशात शोककळा पसरली. बॉलिवूडमधील अनेक सेलेब्सनेही सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे. अशातच काँट्रोव्हर्सी क्वीन राखी सावंतने जेटलींवर भाष्य करत एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामुळे नेटकरी संतापले आहेत.

नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओत राखीने दावा केला आहे की, “तिला जेटलीच्या निधनाबद्दल आधीच माहिती होती. तिच्याकडे ईश्वरीय शक्ती आहे ज्यामुळे काही गोष्टी तिला आधीच कळतात. राखी म्हणाली की, “जेटलीजी जे आपले बीजेपी नेता आहेत. ते आज आपल्यात नाहीत. मी एका आठवड्यापूर्वी नाही तर १० दिवसांपूर्वीच म्हटलं होतं.”

View this post on Instagram

Rip 🙏😪

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

राखी पुढे म्हणते की, “मला कधी कधी अशी स्वप्ने येतात ज्याच्यातून मला असं कळतं. माहिती नाही कसं पण ही एक ईश्वरीय शक्ती आहे. थँक्स टू गॉड. मला १० दिवसांपूर्वीच त्यांच्या निधनाबद्दल माहिती होतं. मला एवढंच म्हणायचं आहे की, त्यांच्या आत्म्यास शांती मिळो. पूर्ण भारत त्यांना स्मरेल.”

राखीच्या या व्हिडीओवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. नेटकऱ्यांनी राखीला ट्रोल केले आहे. सध्या राखीचा हा व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

 

You might also like