भर रस्त्यात बसून ‘ढसाढसा’ रडली राखी सावंत, भावुक करेल ‘हा’ व्हिडिओ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –    राखी सावंतची (Rakhi Sawant) आई जया सावंत गेल्या अनेक महिन्यांपासून कॅन्सरशी लढत होती. राखीच्या आईवर मोठी शस्त्रक्रिया झाली. या शस्त्रक्रियेद्वारे तिच्या आईच्या शरीरातील कॅन्सर ट्यूमर काढण्यात आली. राखीने एक व्हिडिओ शेअर करत, ही माहिती दिली आहे. शिवाय सलमान खान आणि सोहेल खान या दोघांचे मनापासून आभार मानले आहेत.

सलमान खान तिच्या मदतीला धावून आला. राखीच्या आईच्या उपचाराचा सर्व खर्च त्याने आपल्या खांद्यावर घेतला आणि काल राखीच्या आईवर यशस्वी शस्त्रक्रिया करत, तिच्या पोटातील कॅन्सरचा ट्युमर बाहेर काढण्यात आला. आई आता कॅन्सरमुक्त झाली, हे पाहून राखी भावूक झाली. सलमानचे आभार मानताना तिला शब्द कमी पडलेत आणि ती ढसाढसा रडू लागली.

‘माझ्याजवळ पैसे नव्हते़ आईच्या उपचारासाठी डॉक्टरांनी खूप पैसे सांगितले होते. कमीत कमी १५-२० दिवस हॉस्पीटलमध्ये ठेवावे लागणार, असे म्हणाले होते. अशावेळी सलमान व सोहेल भाई देवदूतासारखे माझ्या मदतीला धावून आलेत. त्यांच्यामुळेच माझी आई वाचली,’ असे राखी म्हणते आणि ढसाढसा रडू लागते़,

अक्षरश: जमिनीवर डोकं टेकून ती सलमान खान आणि सोहेल खानचे आभार मानते. “राखीची आई गेल्या अनेक दिवसांपासून पोटाच्या कॅन्सरने ग्रस्त आहे. राखी बिग बॉस १४ मध्ये असताना तिला आईची किमोथेरपी व कॅन्सरबद्दल माहित झाले होते. आईच्या उपचारासाठी राखीला पैशांची गरज होती. या पैशासाठीच तिने १० लाख रूपये घेऊन बिग बॉसचा शो सोडला होता. याशिवाय सलमान व सोहल खानने राखीची मदत केली होती. सलमानने राखीच्या आईच्या उपचाराचा सर्व खर्च उचलला. ”

याआधी व्हिडीओत राखीने म्हटले होते, की “सलमान आणि सोहेल यांच्यामुळेच माझ्या आईचे ऑपरेशन होतेय. त्यांच्यामुळेच माझी आई ठीक आहे. देवाने प्रत्येक घरात सलमान-सोहेल सारखे मुलं जन्माला घालावीत, आज माझ्या आईचे ऑपरेशन आहे. कॅन्सरचा ट्यूमर डॉक्टर काढून टाकतील. मी खूप आनंदात आहेत. आई, आता तुला टेन्शन घेण्याची गरज नाही. तुझ्या शरीरातला कॅन्सर नेहमीसाठी संपणार आहे. मी सलमानला यासाठी धन्यवाद देईल. तूच माझ्या आईचा जीव वाचवला. परमेश्वरामुळे आणि तुझ्यामुळेच आईचे इतके मोठे ऑपरेशन होतेय. तू आम्हाला जगातील सर्वोत्तम डॉक्टर आम्हाला दिलास. मी परमेश्वराला प्रार्थना करते की, भारताच्या प्रत्येक घरात सलमान व सोहेलसारखा मुलगा जन्मास येवो. सलमानच्या कुटुंबाचेही मी आभार मानते़ तुम्ही आमच्यासाठी देवदूत बनून आलात.”