राखी सावंतचा नवा ड्रामा… म्हणे लग्नानंतर पतीसोबत बहिण बनून राहणार

मुंबई : वृत्तसंस्था – वादग्रस्त विधान करून सतत चर्चेत असणारी बोल्ड आणि बिनधास्त ‘आयटम गर्ल ‘ म्हणून प्रसिद्ध असलेली राखी सावंत सुद्धा आता लग्नांबंधनात अडकणार आहे. राखीला नेहमी कोणत्याही कारणाने चर्चेत राहायला प्रचंड आवडत. चर्चेत राहण्यासाठी ती दररोज काही ना काही ड्रामा करतच असते. आता ती  एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. हा व्हिडीओ एका  प्रेसकॉन्फरन्सचा आहे. जिथे राखीने तिच्या होणाऱ्या पतीसोबत हायव्होल्टेज ड्रामा सुरू केला.
राखी सावंत ही बॉलिवूडची ड्रामा क्वीन असून यात तिचा होणारा पतीही तिला याबाबतीत  तोडीस तोड भेटला आहे. अलीकडेच राखी सावंतने एक प्रेसकॉन्फरन्स बोलावली होती. यादरम्यान तिचा होणारा पती दीपक कलाल आणि राखी सावंत यांनी नेहमीप्रमाणे ड्रामा सुरू केला. माध्यम प्रतिनिधींसमोर त्यांनी एकमेकांसोबत अश्लील भाषेत संवाद सुरू केला.
कोणत्याही गोष्टीवरून दुसऱ्या सोबत तुलना करण्याची सवय असलेली राखी यावेळी म्हणाली की ,’दीपिका पादुकोण हिने लग्नात १ कोटीचा लहंगा घातला होता, असे मी ऐकले आहे , यानुसार तर मी माझ्या लग्नात ८ कोटींचा लहंगा घालायला पाहिजे.लग्नाविषयी माहिती देताना राखी व तिच्या पतिने तर हद्दच केली. ‘ पुढे राखी म्हणते,’लग्नानंतर मी आणि दीपक कलाल हे भाऊ-बहीण बनून राहणार आहोत. लग्नाच्या रिसेप्शनमध्ये मी शाहरूख, सलमान, करिना आणि दीपिका यांना आमंत्रण दिले आहे. तसेच दीपक म्हणाला,’आमच्या लग्नाचे बजेट जास्त नसून केवळ ७० कोटी आहे. त्यावर बोलता बोलता राखीने त्याला अडवत विचारले,’त्यांनी ८५ कोटींचा उल्लेख केला होता, १५ कोटी कुठे गेले? त्यावर दीपकने म्हटले की, काही पैसा कपड्यांमध्ये खर्च झाला आहे.’
तिने हे देखील सांगितले की, तिच्या लग्नात अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप हे देखील येणार असल्याचे तिने सांगितले आहे. राखी व दीपक कलाल यांनी अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले असून त्यांनी यात न्यूड वेडिंग करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
अभिनेत्री राखी सावंत या ना त्या कारणाने सतत चर्चेत असते. राखी सावंत काही उलट सुलट गोष्टी करत किंवा नेहमी काही ना काही वादग्रस्त वक्तव्य करत कायम चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच विदेशी महिला कुस्तीपटूने राखीला धोबीपछाड केलं होतं. रेसलिंग रिंगमधून थेट रुग्णालयात जाण्याची वेळ राखीवर ओढावली होती. पंचकुलातील ताऊदेवी लाल स्टेडियममध्ये ग्रेट खली आयोजित रेसलिंग शोमध्ये राखीला दुखापत झाल्याची घटना घडली होती.