रक्षाबंधन विशेष ! कपाळावर टिळा लावल्याने शरीराला होतात ‘हे’ ७ फायदे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शुभ काम करताना किंवा महत्वाचे काम करताना बऱ्याचदा औक्षण केले जाते, टिळा लावला जातो ज्या त्या प्रदेशानुसार आणि संस्कृतीनुसार लोक टिळा लावत असतात. कोणी आडवा तर कोणी उभा टिळा लावत असते. जुन्या लोकांना टिळा लावण्याशिवाय घराबाहेर पडण्याची सवय नव्हती. टिळा लावण्याचे अनेक फायदे आहेत शारीरिक दृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्यासुद्धा टिळा लावल्याचे समाधान व्यक्तीला मिळते.

टिळा लावण्याने पुढील होतात फायदे –
१.
टिळा लावल्याने व्यक्तिमत्व प्रभावशाली वाटते, टिळा लावल्याने व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो,
२. कपाळावरती टिळा लावल्याने लोकांना शांततेचा सुखद अनुभव येतो
३. डोक्यामध्ये सेराटोनिन आणि बीटा एंडोर्फिनचे वहन संतुलित पद्धतीने होत असते, ज्यामुळे निराशा दूर होते आणि उत्साह वाढतो.
४. टिळा लावल्याने डोकेदुखी सारखे आजार होत नाहीत.
५. हळदीचा टिळा लावल्याने त्वचा शुद्ध होते आणि शरीर निरोगी राहते.
६. धार्मिक मान्यतेनुसार चंदनाचा टिळा लावल्याने मनुष्यांच्या पापाचा नाश होतो.
७. असेही मानले जाते की चंदनाचा टिळा लावणाऱ्याचे घर अन्न धान्याने भरून राहते आणि त्याची प्रगती होते.

आरोग्यविषयक वृत्त