केवळ 1110 रुपयात घरी आणा नवी इलेक्ट्रिक स्कूटर, रक्षाबंधनाला बहिण होईल ‘खुश’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Ampere Vehicles ने व्हेईकल लीज स्टार्टअप  OTO Capital सोबत भागीदारीत लीज प्रोग्राम सादर केला आहे. याअंतर्गत तुम्ही स्टँडर्ड ईएमआयने कमी किमतीत अ‍ॅम्पियरची इलेक्ट्रिक स्कूटर घरी आणू शकता. ही स्कूटर लीज प्रोग्राम अंतर्गत घेतल्यास तुम्हाला प्रत्येक महिन्याला 1,110 रुपये द्यावे लागतील. इलेक्ट्रिक वाहनांना भारतात 2019 मध्ये मोठ्या प्रमाणात प्रमोट करण्यात आले होते. या वाहनांमुळे पर्यावरण प्रदूषण होत नाही.

सध्या अ‍ॅम्पियर इलेक्ट्रिक स्कूटरसाठी हा लिजिंग प्रोग्राम 1 ऑगस्टपासून बेंगळुरुत सुरू होईल. यानंतर यावर्षी अखेरपर्यंत ही सुविधा पुणे, हैद्राबाद, दिल्ली, चेन्नई आणि कोचीनमध्ये सुद्धा सुरू केली आहे.

अशाप्रकारे घ्या स्कीमचा लाभ

* अ‍ॅम्पियर व्ही 48 इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 34,249 रुपये आहे, तर मंथली ईएमआय 1,610 रुपये आहे. जर तुम्हाला ही स्कूटर लीज प्रोग्राम अंतर्गत घ्यायची असेल तर प्रत्येक महिन्याला 1,110 रुपये द्यावे लागतील.

* अशाच प्रकारे अ‍ॅम्पियरची झील इलेक्ट्रिक स्कूटर फायनान्स केल्यानंतर याचा ईएमआय 3,020 रुपये होईल, तर लीज वर ती 2,220 रुपये मंथली पेमेंटवर घेता येईल. या स्कूटरची खासियत ही आहे की, ही सिंगल चार्जमध्ये 75 किमी अंतर कापते.

अशाप्रकारे करा बुक –

* अ‍ॅम्पियरची इलेक्ट्रिक स्कूटर लीजवर घेण्यासाठी ओटीओ कॅपिटलच्या वेबसाइटवर जा.

* वेबसाइटशिवाय डिलरशिपच्या माध्यमातून बुक करू शकता.

* कंपनी स्कूटरची होम डिलीव्हरी सुद्धा करत आहे.

* नॉर्मल गाडीप्रमाणे डॉक्युमेंटेशन प्रोसेस करावी लागते.

* डॉक्युमेंट प्रोसेसच्या 48 तासानंतर ग्राहकाला त्याची इलेक्ट्रिक स्कूटर मिळेल.