Homeताज्या बातम्याRaksha Bandhan | समाज रक्षणाचे 'त्यांनी' दिले वचन ! दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये...

Raksha Bandhan | समाज रक्षणाचे ‘त्यांनी’ दिले वचन ! दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांसमवेत रक्षाबंधन उत्साहात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Raksha Bandhan | आजच्या धकाधकीच्या जीवनात नात्यांमधून निर्माण होणारे प्रेम आणि आपुलकीचे क्षण आमच्यासाठी खुपच महत्वाचे आहे. या आपल्या नात्यांचे अतूट बंधन दृढ करण्याची ग्वाही देताना समाजाच्या रक्षणाबरोबर महिलांच्या संरक्षणासाठी (Protection) सदैव दक्ष राहू असे वचन दत्तवाडी पोलीस स्टेशनमधील (Dattawadi Police Station) पोलिसांनी रक्षाबंधनाच्या (Raksha Bandhan) कार्यक्रमात भगिनींना दिले.

 

समाजाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या पोलीस बांधवांना (Pune Police) कोणताही सण साजरा करता येत नाही. घरापासून लांब असलेल्या या पोलिसांना काही काळ जिव्हाळ्याचा क्षण अनुभवता यावा आणि समाजव्यवस्था आणि त्यांच्यात विश्वासाचे, जिव्हाळयाचे नाते निर्माण व्हावे या उद्देशाने गेल्या 10 वर्षांपासून माजी उपमहापौर आबा बागुल (Former Deputy Mayor Aba Bagul), काँग्रेसचे युवा नेते अमित बागुल (Congress Youth Leader Amit Bagul) यांच्या पुढाकाराने दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांसमवेत रक्षाबंधन (Raksha Bandhan) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

समाजाच्या रक्षणासाठी सतत दक्ष असणाऱ्या पोलिसांना कर्तव्य बजावताना वेळेचे बंधन नाही, पर्यायाने कुटुंबासमवेत सण साजरा करताही येत नाही. सतत ताणतणावात असणारे पोलीस मात्र दत्तवाडी पोलिस स्टेशनमध्ये यंदा 11 व्या वर्षीही झालेल्या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमामुळे तणावविरहित दिसले.
यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन (Senior Police Inspector Abhay Mahajan),
पोलीस उप निरीक्षक कामठे (PSI Kamthe), संयोजक अमित बागुल आणि पोलीसवर्ग तसेच
उज्ज्वला खरात, मीना गोकाक, शर्मिला गायकवाड, लक्ष्मी पवार, सागर आरोळे,
इम्तियाज तांबोळी, महेश ढवळे,सूरज सोनवणे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

 

Web Title :- Raksha Bandhan | Rakshabandhan on the initiative of
former deputy mayor Aba Bagul, Congress youth leader Amit Bagul

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News