अरूणाचलपासून लडाखपर्यंत, चीनच्या सीमेवर तब्बल 43 पुलांचं आज उद्घाटन करणार राजनाथ सिंह

पोलिसनामा ऑनलाईन टीम : गेल्या पाच महिन्यांपासून लडाखच्या सीमेवर चीनबरोबर तणाव सुरू आहे. अशा परिस्थितीत भारत आपल्या सीमा मजबूत करण्यात व्यस्त आहे. या भागातील आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह चीनच्या सीमेवर एकूण ४३ महत्वाच्या पुलांचे उद्घाटन करतील. जे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे.

हे सर्व पूल सीमा रस्ते संघटनेने (BRO) तयार केले आहेत. हे सर्व पूल देशातील सात राज्यात बांधले गेले असून त्याचे उद्घाटन संरक्षणमंत्री यांच्या हस्ते होणार आहे.

• जम्मू-कश्मीर –      १० पुल
• लद्दाख –                ७ पुल
• हिमाचल प्रदेश –      २ पुल
• पंजाब –                  ४ पुल
• उत्तराखंड –             ८ पुल
• अरुणाचल प्रदेश – ८ पुल
• सिक्किम –             ४ पुल

इतकेच नाही तर गुरुवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह अरुणाचल प्रदेशच्या तवांगमध्ये निचिफू बोगद्याची पायाभरणीसुद्धा करतील. हे बांधकाम सुद्धा बीआरओद्वारे केले जाईल, ज्याच्या मदतीने सैन्याला सीमेवर जाणे सोपे होईल. या ४३ पुलांपैकी २२ पुल थेट चीन सीमेशी संबंधित आहेत. आणि सैन्याच्या हालचाली, वाहने आणि शस्त्रे घेऊन जाण्याच्या बाबतीत त्यांचे महत्त्व खूप जास्त आहे.

काही दिवसांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी रोहतांग बोगदा देशाला समर्पित करणार आहेत, ज्यांचे सामरिक महत्त्व खूप आहे. जेव्हा चीनच्या सीमेवर तणाव निर्माण होतो आणि भारतीय लष्कर लडाखपासून अरुणाचल आणि उत्तराखंड, सिक्कीम पर्यंत सतर्क असते, तेव्हा या पूलाची सैन्याला मोठ्या प्रमाणात मदत होईल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like