उन्नती फाऊंडेशनचे जवानांसोबत रक्षाबंधन

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

उन्नती सोशल फाऊंडेशन व आनंद हास्य योगा क्लब यांच्यावतीने औंध कॅम्प येथील ३३० शिवनेरी इन्फेन्ट्री ब्रेगेड येथे जवानांन सोबत रक्षाबंधन उत्साहात साजरा करण्यात आला. फाउंडेशनच्या व हास्य क्लबच्या महिला सदस्यांनी येथील अनेक जवानांना राखी बांधून त्यांचे आक्षवन करण्यात आले.
[amazon_link asins=’B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f3bd6eb3-aa00-11e8-ab1c-435ea2c437b3′]

फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे, अर्चना भालेराव, सुषमा सुतार, सुनीता बाचे, जयश्री भोसले, मीनाक्षी देवतारे, सविता देशमुख, संगीता काटे, सुवर्णा काटे, दीपा लुला,फाऊंडेशनचे संस्थापक संजय भिसे, राजेंद्र जस्वाल, राजू देवतारे, रामप्रकाश वासन, प्रकाश माशाळकर, लेखराज मेहता, बच्छराज शर्मा संजय डांगे यांच्यासह परिसरातील, सामाजिक,अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेचा निकाल जाहिर 

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना कुंदा भिसे म्हणाल्या, जे जवान आपल्या प्राणाची पर्वा न करता सरहद्दीवर आहोरात्र पहारा देतात त्यामुळेच आपण आपल्या घरात शांत व आरामात राहात असतो,  त्यांच्या पाठीशी आपण ठाम पणाने उभे राहणे हे प्रत्येक भारतीयांचे व देशातील महिलांची जवाबदारी आहे. आपली साथ व पाठींबा त्यांच्या पाठीशी असेल तर त्यांचे मनोधैर्य वाढत असते त्यामुळे अशा विविध उपक्रमातून त्यांचे मान सन्मान होणे गरजेचे आहे.
[amazon_link asins=’B01FM7GGFI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’097d8462-aa01-11e8-a6b6-17e9925cfbd2′]

याप्रसंगी जवानांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले आम्ही आमची जवाबदारी पार पाडत असताना या रक्षाबंधनाच्या निमित्ताने आमच्या बहिणी आम्हाला मिळाल्या असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
पेट्रोल – डिझेलच्या दरात विक्रमी वाढ