रकुल प्रीतनं फोडलं रियावर ‘खापर’, म्हणाली – ‘मी कधीच ड्रग्स घेतलं नाही, ना कोणत्या पेडलर्सशी संबंध’

मुंबई : वृत्तसंस्था – एनसीबीने रकुलप्रीत सिंगची ड्रग्ज कनेक्शनच्या संदर्भात चौकशी केली. यादरम्यान, रकुलप्रीतने रिया चक्रवर्ती वर सर्व आरोप केले आहेत. सूत्रानुसार, रकुलने एनसीबीसमोर ड्रग्स घेतले नसल्याचं सांगितलं. परंतु एनसीबीला यावर विश्वास नाही. ड्रग्सच्या पेडलर्सशी संबंध असल्याचेही रकुलने नाकारले आहे.

रकुलने रियाशी ड्रग चॅट केल्याची कबुली दिली

रकुलने 2018 मध्ये रियाबरोबर ड्रग चॅट केल्याची कबुली दिली आहे. रकुलने एनसीबीला सांगितले की रिया गप्पांमध्ये तिचा माल (वीड) मागवत होती. रियाचं सामान (ड्रग्ज) तिच्या घरी होतं. तथापि, आता एनसीबीची टीम रकुलच्या सांगण्यात किती सत्य आहे याचा तपास करेल. रकुल प्रीतची चौकशी सुरूच राहणार आहे.

रिया चक्रवर्तीने चौकशीत रकुलप्रीत सिंगचे नाव एनसीबीला दिले होते. रकुल ड्रग्ज घेत असल्याचे सांगितले. रकुल आणि रिया दोघीही चांगल्या मैत्रिणी आहेत. पण आता जेव्हा दोघी संकटात सापडल्या आहेत, तेव्हा ब्लेमच्या खेळाचा क्रम स्पष्ट दिसत आहे. रिया ड्रग्ज प्रकरणात मुंबईच्या भायखळा कारागृहात बंद आहे. तिला कोर्टाकडून जामीनही मिळत नाही.

गुरुवारी हैदराबादमध्ये आपल्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी रकुलप्रीत सिंग मुंबई सोडून गेली. रकुलने अनेक हिंदी आणि दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये काम केले आहे. रकुलनंतर एनसीबी शनिवारी दीपिका पादुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांची चौकशी करेल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like