मिनी ड्रेस घालून निघाली अभिनेत्री रकुल प्रीत सिंह अन् झाली Oops Moment ची शिकार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री रकुल प्रीत सिंह ही मिनी ड्रेस घातलेली दिसली. पण नेमकं त्याच दरम्यान तिला Oops Moment चा सामना करावा लागला. त्यानंतर तिने कसंतरी स्वत: सावरलं. पण यापूर्वी अभिनेत्री क्रिस्टल डिसूजा हिलादेखील Oops Moment मधून जावे लागले होते. यातील विशेष बाब म्हणजे त्यावेळी क्रिस्टलचा वाढदिवस होता. क्रिस्टल तिची बर्थडे पार्टी साजरा करत होती. त्याचदरम्यान मजेत तिच्या मित्रांनी तिला उचलले. पण तेव्हा तिने शॉर्ट कपडे घातले होते. त्यानंतर ती खाली उतरली.

क्रिस्टल डिसूजानंतर रकुल प्रीत सिंह हिला Oops Moment मधून जावे लागले होते. अभिनेत्री रकुल प्रीत सिंह हिने कन्नड चित्रपट ‘गिल्ली’तून पदार्पण केले. त्यानंतर ती तमिळ आणि तेलगू चित्रपटात दिसली. बॉलिवूडमध्ये रकुल प्रीतने 2014 मध्ये फिल्म ‘यारिया’मधून पदार्पण केले. त्यानंतर ‘अय्यारी’ आणि ‘दे दे प्यार दे’सारख्या चित्रपटातही दिसली. रकुल प्रीतने ‘मरजावा’ या फिल्ममध्ये शेवटची भूमिका केली. त्यानंतर ती चित्रपटात दिसली नाही.

रकुल प्रीत सोशल मीडियावर सतत ऍक्टिव्ह असते. ती सतत फिटनेस व्हिडिओ आणि फोटोज् शेअर करून लोकांना आरोग्यविषयक जागरूक करते. ती फिल्ममुळे चांगलीच उत्साहित आहे. तिने याची माहिती सोशल मीडियावर दिली. सध्या ती ‘मेडे’ फिल्मची तयारी करत आहे. रकुल प्रीत बॉलिवूडच्या मोठ्या प्रोजेक्टशी संबंधित आहे. ती लवकरच ‘बिग बी’ अमिताभ बच्चन आणि अजय देवगनसह चित्रपटात दिसणार आहे.