जिजामाता विद्यालयाच्यावतीने जेजुरीत एड्स विरोधी जनजागृती

पुरंदर : पोलीसनामा ऑनलाइन – जेजुरी येथील जिजामाता ज्युनियर कॉलेज आणि जेजुरी ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने जागतिक एड्स दिननिमित्त जेजुरी शहरातून जन जागृती रॅली तसेच रांगोली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे विद्यालयाच्या आरोग्य विभागाच्या प्रमुख छाया पोटे यांनी सांगितले.

जागतिक एड्स दिनानिमित्त दि. 4 रोजी जिजामाता विद्यालय आणि जेजुरी ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने एड्स विषयी जन जागृती फेरी काढण्यात आली होती. जिजामाता विद्यालय ते नंदी चौक, मेन पेठ, ग्रामीण रुग्णालय परिसर, जोशी आली, जानुबाई आली या भागातुन ही फेरी काढण्यात आली. या जनजागृति फेरीत घटकेची मजा आयुष्याची सजा, एड्स मुक्त जीवन एड्स मुक्त आयुष्य, रक्तदान केल्याने एड्स होत नाही असे फलक व घोषणा देण्यात आल्या.

महाविद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार सागर, प्रा. छाया पोटे, ग्रामीण रुग्नालयाच्या समुपदेशक सुरेखा काकड़े, मोनाली कदम, विद्यालयाच्या लीना पायगुडे, प्रल्हाद गिरमे आदिंनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. विद्यालयात एड्स जन जागृती विषयी रांगोली स्पर्धा घेण्यात आली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like