Ram Charan | अभिनेता रामचरण लवकरच झळकणार हॉलीवुडमध्ये; एका मुलाखती दरम्यान अभिनेत्यानेच केला खुलासा

पोलीसनामा ऑनलाइन : ऑस्कर पुरस्कारामुळे दाक्षिणात्य सुपरस्टार रामचरण (Ram Charan) सध्या चर्चेत आहे. ‘आरआरआर’ या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याने ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बाजी मारली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती. आता रामचरण (Ram Charan) भारतात परतला असून त्याने दिलेल्या एका मुलाखतीत हॉलिवूडच्या सिनेमात काम करण्यावर त्यांनी वक्तव्य केले आहे.

त्यावेळी रामचरण म्हणाला की, “हॉलीवुड मध्ये पदार्पण करण्यासाठी मी सध्या सज्ज आहे. पण आता याबाबत बोलायची ही योग्य वेळ नाही असे मला वाटते. सध्या यावर काम सुरू असून मी लवकरच याची घोषणा करेन. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते”. रामचरणने याबाबत अधिक माहिती देण्यास टाळाटाळ जरी केली असली तरी तो लवकरच हॉलीवुड सिनेमात झळकणार असल्याने चाहते मात्र आनंदीत झाले आहेत.

भारतात येण्याआधी देखील रामचरणने (Ram Charan) अमेरिकेमध्ये एका मुलाखतीत हॉलीवुड मध्ये
काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि आता आरआरआर नंतर त्याच्या हातात मोठा प्रोजेक्ट
असल्याचे त्यांनी सांगितले. आता रामचरण भारतानंतर भारताबाहेर देखील आपल्या अभिनयाचे ठसे
उमटवण्यासाठी सज्ज झाला आहे. रामचरण सध्या त्याच्या ‘RC15’ या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
या चित्रपटात त्याच्यासोबत बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी दिसणार आहे.
या व्यतिरिक्त रामचरण सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ मध्ये देखील झळकणार आहे. हॉलिवूडच्या सिनेमात राम चरण हॉलिवूड अभिनेता ब्रॅड पीटसोबत स्क्रीन शेअर करु शकतो अशी चर्चा सुरू आहे. या व्यतिरिक्त टॉम क्रूझ, ज्युलिया रॉबर्ट्स आणि ब्रॅड पिट यांच्यासोबत देखील काम करण्याची इच्छा रामचरणने व्यक्त केली होती.

Web Title :- Ram Charan | ram charan on hollywood debut know latest update of entertainment

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde – Gopinath Munde | लोकनेते गोपीनाथराव मुंडे अठरा पगड जातींना न्याय देणारे व्यक्तिमत्व – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

MP Sanjay Raut | देवेंद्रजी, गरिबांच्या मुली रस्त्यावर पडल्या आहेत का?, संजय राऊतांनी बार्शीमधील ‘त्या’ पीडित मुलीचा फोटो केला शेअर

Pune ACB Trap | पोलिस निरीक्षकाकरिता 3 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणारा निघाला आमदाराचा चुलत भाऊ, युवक काँग्रेसचा प्रदेश महासचिव अ‍ॅन्टी करप्शनच्या ‘जाळयात’