Ram Charan | राम चरणला ‘या’ खेळाडूच्या बायोपिकमध्ये करायचे आहे काम; अभिनेता म्हणाला, “माझी व्यक्तिरेखा …..”

पोलीसनामा ऑनलाइन : Ram Charan | नुकताच 13 मार्चला 95 वा ऑस्कर पुरस्कार संपन्न झाला. तर यंदाचा ऑस्कर पुरस्कार भारतासाठी खूपच महत्त्वाचा होता. या ऑस्कर पुरस्कारात ‘द एलिफंट व्हिसपर्स’ या शॉर्ट फिल्मला ‘बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्म’ या कॅटेगरीत अवॉर्ड मिळाला. तर एस.एस.राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्यालाही ‘बेस्ट ओरिजिनल साँग’ या श्रेणीत पुरस्कार मिळाला आहे. यानंतर या चित्रपटातील कलाकारांसोबतच सर्वच जण खूपच चर्चेत होते. (Ram Charan)

‘नाटू नाटू’ या गाण्याला ऑस्कर मिळाल्यानंतर सर्व स्तरावरून सर्वच जण कलाकारांचे कौतुक करताना दिसत आहेत. या अवॉर्डमुळे दाक्षिणात्य अभिनेता रामचरण देखील खूपच चर्चेत आहे. तर रामचरण नुकताच ऑस्कर जिंकून परतल्यानंतर त्याने पहिल्यांदा गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यामुळे देखील सोशल मीडियावर तो ट्रोल झाला होता. तर नुकताच एका कार्यक्रमात त्याने हजेरी लावली. यावेळी त्यांनी भविष्यात त्याला कोणती भूमिका साकारला आवडेल यावर भाष्य केले आहे.

या कार्यक्रमात रामचरणला (Ram Charan) येणाऱ्या काळात कोणती भूमिका साकारायला तुम्हाला आवडेल असा प्रश्न विचारण्यात आले होता. यावर उत्तर देताना रामचरण म्हणाला, “एखाद्या खेळाशी निगडित असलेली भूमिका साकारायला मला नक्कीच आवडेल. मला आता स्पोर्ट्स फिल्म करायची आहे”. यावर एका व्यक्तीने विराट कोहलीच्या बायोपिकचा पर्याय सुचवला त्यावेळी बोलताना रामचरण म्हणाला, “विराट एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे आणि जर मला त्याच्या बायॉफिक मध्ये काम करायची संधी मिळाली तर मी स्वतःला खूप भाग्यवान समजेल आणि मी ती भूमिका नक्कीच साकारेन तसेही मी बराच विराट सारखा दिसतो असे प्रत्येक जण मला म्हणतो”. सध्या त्याच्या या उत्तराने प्रेक्षक देखील त्याला विराटच्या बायोपिक मध्ये पाहण्यासाठी आतुर झाल्याचे दिसत आहे.

तर नुकताच विराटचा वानखेडे स्टेडियमवर ‘नाटू नाटू’ या गाण्याची हुकस्टेप करतानाचा व्हिडिओ चांगलाच
गाजला होता. आता रामचरणला या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक देखील आतुर झाले आहेत.
रामचरणच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास तो ‘आरसी 15’ या चित्रपटात व्यस्त आहे.
सध्या तरी या चित्रपटाचे नाव ठरलेले नाही मात्र हा एक पॅन इंडिया चित्रपट असणार आहे.
या चित्रपटात रामचरण सोबत अभिनेत्री कियारा अडवाणी ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Web Title :- Ram Charan | rrr actor ram charan expresses his desire to play virat kohli in cricketers biopic

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Ravindra Dhangekar | पराभवामुळे त्यांचे डोळे उघडले, 40 टक्के सवलतीच्या निर्णयावरुन रवींद्र धंगेकरांचा सरकारला टोला (व्हिडिओ)

Jayant Patil | ‘…तोपर्यंत शिंदे गटाचं अस्तित्व उरणार नाही’, बावनकुळेंच्या वक्तव्यावरुन जयंत पाटीलांचा शिंदे गटाला धोक्याचा इशारा