Ram Charan | राम चरण ‘नाटू नाटू’ या गाण्यावर ऑस्कर सोहळ्यात डान्स सादर करणार? सोशल मीडियावर चर्चा सुरु

पोलीसनामा ऑनलाइन – Ram Charan | सध्या राजामौली यांच्या ‘आरआरआर’ या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. नुकताच या गाण्याने गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकावला होता. तर आता या गाण्याला ऑस्कर मध्येही नामांकन मिळाले आहे. या गाण्याला गोल्डन ग्लोब व क्रिटिक्स चॉइस अवॉर्ड मिळाल्यानंतर आता हे गाणे भारताला ऑस्कर देखील मिळवून देईल अशी इच्छा सगळे नेटकरी वर्तवत आहेत. भारतीय प्रेक्षक ऑस्कर साठी चांगलेच उत्सुक असल्याचे दिसत आहे. (Ram Charan)

यंदाचा ऑस्कर 12 मार्च 2023 रोजी संपन्न होणार आहे. तर यामध्ये हॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका रिहाना, लेडी गागा यांना देखील नामांकन मिळालेले आहे. तर या सोहळ्यात रिहाना या त्यांच्या ब्लॅक पॅंथर चित्रपटाचे गाणे सादर करणार आहे. तर आता RRR चित्रपटाची टीम सुद्धा या सोहळ्याला उपस्थित राहणार आणि अभिनेता रामचरण नाटू नाटू या गाण्यावर डान्स करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत अभिनेता रामचरणला विचारले असता त्याने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, “ज्या ज्या ठिकाणी या
गाण्याचे कौतुक होते त्या ठिकाणी आम्हाला नाटू नाटू गाण्यावर डान्स करायला नक्कीच आवडेल.
पण सगळ्याच ठिकाणी हे शक्य नाही.
जर ऑस्कर सोहळ्यात उपस्थित आम्ही राहू शकलो तर तिथे आम्ही नक्कीच हा डान्स करू, तिथे जर लोकांनी आम्हाला विनंती केली आणि तेवढा वेळ असेल तर नक्कीच या गाण्यावर परफॉर्म करायला आवडेल.
संपूर्ण गाणे सादर करणे कठीण आहे पण त्यातील मुख्य हुक स्टेप सादर करायला आम्हाला नक्कीच आवडेल”.

RRR या चित्रपटात नाटू नाटू या गाण्यात राम चरण (Ram Charan) सोबत ज्युनिअर एनटीआर देखील अद्भुत
पूर्व डान्स करताना पाहायला मिळाले. या गाण्याला मिळालेले पुरस्कार त्याचबरोबर भारताबाहेर या चित्रपटाला
मिळणारी प्रसिद्धी पाहता या गाण्याला ऑस्कर मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पुढील महिन्यात होणाऱ्या ऑस्करला RRR चित्रपटाची संपूर्ण टीम हजेरी लावेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Advt.

Web Title :-Ram Charan | rrr actor ram charan says he would be happy to dance on naatu naatu at oscars event

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ayushmann Khurrana | बॉलीवूडबाबत अभिनेता आयुष्मान खुरानाने केले मोठे वक्तव्य; म्हणाला “बॉलीवूड मध्ये टॅलेंट…”

Pune Kasba Peth Bypoll Election | हा तर पॉलिटिकल स्टंट, रविंद्र धंगेकरांच्या उपोषणावर देवेंद्र फडणवीसांची टीका

Pune Kasba Peth Bypoll Election | पराभव दिसत असल्याने धंगेकर सहानुभूति निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, भाजपचा धंगेकरांवर आरोप (व्हिडिओ)