राम गोपाल वर्मांच्या ‘कोरोना’वरील सिनेमाचा ट्रेलर इंटरनेटवर ‘हिट’ ! 19 लाखांहून अधिक Views (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सध्या जगभरात कोरोनानं थैमान घातलं आहे. इंडस्ट्रतील अनेक लोक कोरोना व्हायरसवर सिनेमा बनवू इच्छित आहेत अशात डायरेक्टर राम गोपाल वर्मा यांनी कोरोनावर तयार केलेल्या सिनेमाचा ट्रेलरही लाँच केला आहे. हा ट्रेलर एवढा व्हायरल झाला की, काही तासातच लाखो लोकांनी पाहिला आहे.

राम गोपाल वर्मांनी जो ट्रेलर युट्युबवरून रीलज केला आहे तो तेलगू भाषेतला आहे. यात अॅक्टर श्रीकांत अयंगर प्रमुख भूमिकेत आहे.

अगस्त्य मंजूनं हा सिनेमा डायरेक्ट केला आहे. आतापर्यंत हा ट्रेलर 19 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. हा ट्रेलर पाहिल्यानंतर तुम्हाला भीतीही वाटेल आणि अंगावर काटाही येईल.

अलीकडेच राम गोपाल वर्मा यांनी सोशल मीडियावर क्लायमॅक्स या त्यांच्या दुसऱ्या सिनेमाचा ट्रेलर 17 मे 2020 रोजी शेअर केला होता. यात मियाचे अनेक बोल्ड सीन्स आहेत. क्लायमॅक्सचा ट्रेलर पाहून लक्षात येतं की हा एक थ्रिलर सिनेमा आहे. यातील सीन अंगवार काटे आणणारे आहेत. खास बात अशी की, पॉर्न स्टार मियाची अॅक्टींगही लोकांना आवडत आहे. यात मियानं न्यूड आणि इंटिमेट सीन्स दिले आहेत ज्यांनी सोशलवर आग लावली आहे. सध्या या ट्रेलरनंही इंटरनेट तापवलं आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like