राम गोपाल वर्मांचं ‘बिग बी’ अमिताभसाठी ट्विट, म्हणाले – ‘मी तुमच्यासाठी प्रार्थना नाही करणार, परंतु …’

पोलिसनामा ऑनलाईन – गेल्या 4 महिन्यांपासून देशात कोरोनाचा प्रकोप सुरूच आहे. कोरोनाच्या केसेस रोजच वाढत आहेत. बॉलिवूडमध्येही याचा प्रकोप वाढताना दिसत आहे. लोकांना या महामारीबद्दल जागरूक जागरूक करणाऱ्या बिग बी अमिताभ बच्चन आता कुटुंबासहित कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. बिग बी यांना कोरोना झाल्यानंतर प्रत्येकजण त्यांच्या ठिक होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. फेमस डायरेक्टर राम गोपाल वर्मा यांनीही बिग बींना कोरोना झाल्यावर यावर प्रतिक्रिया दिली आहे. परंतु त्यांनी खूप अनोख्या अंदाजात आपलं म्हणणं मांडलं आहे.

राम गोपाल वर्मा यांनी ट्विट केलं की, “सरकार मला पूर्ण विश्वास आहे की, तुम्ही कोरोनाला लाथ मारून मजबूतीनं पुन्हा वापसी कराल, जसं की तुम्ही कायमच राहता. मी तुमच्यासाठी प्रार्थना नाही करणार, परंतु मी कोरोनासाठी प्रार्थना करेन जो तुमच्यावर केलेल्या हल्ल्यात नक्कीच मारला जाईल.”

राम गोपाल वर्मा आणि अमिताभ बच्चन यांनी सरकार, आग आणि सरकार 3 अशा काही सिनेमा सोबत काम केलं आहे.

अमिताभ यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच त्यांचा गुलाबो सिताबो ओटीटीवर रिलीज झाला आहे. याच वर्षात अमिताभ बच्चन अनेक सिनेमांमध्ये दिसणार आहेत. यामध्ये ब्रह्मास्त्र, झुंड, चेहरे, अशा अनेक सिनेमांचा समावेश आहे. यापैकी झुंड सिनेमाचा टीजर आधीच रिलीज झाला आहे. नागराज मंजुळे या सिनेमाचं डायरेक्शन करत आहे. नागपूरमध्ये सिनेमाची शुटींग झाली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like