राम गोपाल वर्मांची पाकिस्तानला तंबी ; पहा काय म्हणाले ते …

मुंबई : वृत्तसंस्था – भारतानं एअर स्ट्राइक करून पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा तळ उद्ध्वस्त केला. सुमारे ३५० दहशतवादी या हल्ल्यात मारले गेले. यानंतर पाकिस्तानने युद्धाची धमकी दिली व बुधवारी काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्नही केला. तो भारताने मोडून काढल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी नरमाईची भूमिका घेत चर्चेची तयारी दाखविली होती. मात्र आज, गुरुवारी सकाळी पुंछ जिल्ह्यातील कृष्‍णा घाटी सेक्‍टरमध्ये पाकिस्‍तानकडून पुन्हा शस्‍त्र संधीचे उल्लंघन करण्यात आले. पाकिस्तानच्या कुरापती अद्याप सुरूच आहेत. यावर दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

पाकिस्तानला तंबी देताना राम गोपाल वर्मा यांनी म्हंटल आहे की ,‘ऐ पाकिस्तान, अगर तुम एक मारोगे तो हम चार मारेंगे. ‘

https://twitter.com/RGVzoomin/status/1100327956432474113
काश्मीरच्या पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे पुरावे मागणारे आणि भारताला धमकी देणारे पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांना राम गोपाल वर्मा यांनी जबरदस्त टोला लगावला होता. चर्चेने प्रश्न सुटत असतील तर तुम्हाला तीनदा लग्न करण्याची गरज पडली नसती’ अशी उपहासात्मक टीका वर्मा यांनी आपल्या ट्विटरवरून केली होती.  विशेष म्हणजे या ट्विटला १५ तासांमध्ये ५ हजारहून अधिक लोकांनी रिट्वीट  तर २२ हजारहून अधिक जणांनी लाइक केले होते.
https://twitter.com/RGVzoomin/status/1098238553509765121