Maharashtra Politics | ‘महाविकास आघाडीच्या नेत्यांची नार्को टेस्ट करा’; भाजपच्या आमदाराने केली मागणी

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics | वेदांता फॉक्सकॉन (Vedanta Foxconn) नंतर आता टाटा एअरबस (Tata Airbus) हा लढाऊ विमाने बणविणारा प्रकल्प राज्याबाहेर गुजरातला गेल्याने पुन्हा एकदा राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. विरोधक आणि सत्ताधारी एकमेकाकडे बोट दाखवत आहेत. आता भाजपचे (BJP) आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी एक मागणी केली आहे. वेदांता फॉक्सकॉन आणि टाटा एअरबस महाविकास आघाडीमुळेच (Mahavikas Aghadi) गेला आहे. त्यामुळे त्यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी आमदार राम कदम (Maharashtra Politics) यांनी केली आहे.

वेदांता फॉक्सकॉन आणि एअरबसवरुन विरोधी पक्षाचे नेते खोटे बोलत आहेत. त्यामुळे विरोधी पक्षांच्या सर्व प्रमुख नेत्यांची नार्कोटेस्ट (Narco Test) करावी. वेदांता फॉक्सकॉनच्या टीमने तळेगावला जागा नक्की करून देखील त्यांना इतर राज्यात का जावे लागले? त्यांच्याकडून कोणी आणि किती टक्केवारी, कमिशन मागितले? कोणत्या पंचतारांकीत हॉटेलमध्ये बैठक झाली? यावेळी बैठकीला कोण उपस्थित होते? वेदांताने जागा नक्की करुन देखील त्यांच्यासोबत एमओयू (MOU) का केला नाही? कंपनीच्या प्रमुखांना भेटण्यास टाळाटाळ का आणि कोणाच्या सांगण्यावरुन केली?, असे प्रश्न राम कदम यांनी उपस्थित केले आहेत.

तसेच नार्कोटेस्ट केल्याने सर्व गुपिते आणि वसुलीच्या कहाण्या जनतेच्या समोर येतील. सत्तेच्या काळात ज्यांनी छोट्या मोठ्या हॉटेलवाल्यापासून कॉन्ट्रॅक्टरपर्यंत पैसे उकळले. बदल्यांमध्ये किती करोड रुपये घायचे, ह्याची यादीच बनवली होती. ज्यांनी वाझे पासून अनेक अधिकाऱ्यांना वसुलीच्या खेळात जुपले होते. पोलिसांना सुद्धा ज्यानी सोडले नाही. ते करोडोच्या प्रोजेक्टला सहज काही वसुली न करता सोडतील का ?, असे राम कदम म्हणाले. (Maharashtra Politics)

त्यामुळे महाविकास आघाडीमधील नेते जर प्रामाणिक असतील, तर त्यांच्या प्रमुख नेत्यांनी नार्को टेस्टला सामोरे जावे. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी तळेगावमध्ये सभा घेऊन लोकांची दिशाभूल केली, असे देखील कदम म्हणाले.

Web Title :-  Ram Kadam | bjp leader ram kadam demand to narco test of mahavikas aghadi leader

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics | शिवसेनेचे टीकास्त्र, ‘राज्यात लोकांच्या घराघरांवर मिंधे-फडणवीस सरकारमुळेच सोन्याची…’

Prithviraj Chavan | पृथ्वीराज चव्हाणांनी राष्ट्रवादीला धरले जबाबदार, म्हणाले – ‘भाजप सरकार सत्तेवर यायला कोण…’