Ram Kadam | शिवरायांसोबत आता नोटांवर मोदी, सावरकर, डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमा छापा, भाजप आमदार राम कदमांनी शेअर केले नोटांचे फोटो

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय नोटांवर (Indian Currency ) महात्मा गांधींजींना (Mahatma Gandhi) काढून आता कोणाच्या कोणाच्या प्रतिमा छापायच्या यावर चढाओढ सुरु आहे. सर्वप्रथम आपचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal) यांनी ही मागणी केली. यानंतर भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी मागणी केली होती. आता भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी देखील नवी मागणी केली आहे. नोटांवर शिवाजी महाराज (Shivaji Maharaj), स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar), डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) प्रतिमा छापा, असे त्यांनी ट्वीट केले आहे.

भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी ट्वीट करत नव्या नोटा कशा असतील, याचे फोटो ट्विट केले आहेत. त्यात ते म्हणतात, अखंड भारत..  नया  भारत.. महान  भारत.. जय श्रीराम .. जय मातादी ! आणि खाली त्यांनी शिवाजी महाराज , डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमा असलेल्या नोटा पोस्ट केल्या आहेत. त्यामुळे देशात आता नव्या वादाला सुरुवात झाली आहे.

दोन दिवसांपूर्वी आपचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी भारतीय चलनी नोटांवर गणपती आणि लक्ष्मीच्या प्रतिमा छापा अशी मागणी केंद्र सरकारकडे केली होती. त्यानंतर त्यांच्यावर काँग्रेसने टीका देखील केली होती.
त्यानंतर आमदार नितेश राणे यांनी यासंदर्भात एक ट्वीट केले होते.
नोटांवर मराठा राजा छत्रपती शिवाजी महाराजांची (Chatrapati Shivaji Maharaj) प्रतिमा लावण्याची मागणी
त्यांनी केली होती.

केजरीवाल यांच्या वक्तव्यावर भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी प्रतिक्रिया दिली होती.
अरविंद केजरीवाल नौटंकीबाज मुख्यमंत्री आहे. त्यांना आता स्वत:ला हिंदुत्वावादी नेता म्हणून पुढे यायचे आहे.
गुजरातमधील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी ही मागणी केली आहे.
केजरीवाल यांच्या मागणीवर काँग्रेसने (INC) देखील भाष्य करत टीका केली आहे.
नोटांवरील गांधीजींचा फोटो हटविण्याचा भाजपचा अजेंडा होता.
आणि तो अरविंद केजरीवाल पुढे घेऊन जात आहेत, असे काँग्रेस नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी
म्हंटले होते.

Web Title :- Ram Kadam | bjp mla ram kadam bats for pm modi savarkar ambedkar chatrapati shivaji maharaj photo on currency after arvind kejriwal demands lakshmi ganesh photos on notes

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shinde-Fadnavis Government | दिवाळी संपताच शिंदे-फडणवीस सरकार पुन्हा करणार मोठे प्रशासकीय फेरबदल

Sanjay Aggarwal | ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाच्या पुणे शहर प्रसिद्धीप्रमुखपदी संजय अगरवाल