Ram Kadam | ‘शरद पवार संविधानाला डावलून मंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक कशी काय घेऊ शकतात ?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ram Kadam | राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यासह 22 कर्मचारी संघटनांच्या कृती समितीसह सह्याद्री अतिथीगृहावर सोमवारी बैठक घेतली. एसटी (MSRTC) कामगारांच्या संपाबाबत (ST Workers Strike) ही बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी कामावर हजर झाल्यास कोणतीही कारवाई केली जाणार नाही, अशी ग्वाही परब यांनी दिली, तसेच, किती ताणायचे याचा तारतम्याने विचार करण्याची गरज असून, एसटी सेवा पूर्वपदावर आणण्याचे आवाहन शरद पवार यांनी केले. दरम्यान, या बैठकीवर भाजपचे (BJP) आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी काही सवाल उपस्थित केले आहे.
या बैठकीवरुन भाजपचे आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी प्रश्न उपस्थित केले आहे. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांकडे चार्ज दिला आहे का ? अशी विचारणा केली आहे. ‘शरद पवार घटनाबाह्य संविधानाला डावलून मंत्री आणी अधिकाऱ्यांची बैठक कशी काय घेऊ शकतात?, असा जोरदार प्रश्न देखील राम कदम यांनी उपस्थित केला आहे.
माननीय शरद पवाराना मुख्यमंत्र्यांनी स्वतःचा चार्ज दिला आहे का ? आणी जर नाही तर ते घटनाबाह्य संविधानाला डावलून मंत्री आणी अधिकाऱ्यांची बैठक कशी काय घेऊ शकतात ? आणी शरद पवारांना बैठका घ्यायचाच असतील तर मुख्यमंत्री त्यांना चार्ज का देत नाहीत ? केवळ एकच निदान माफक अपेक्षा.. pic.twitter.com/bU4pcwHWVq
— Ram Kadam (@ramkadam) January 11, 2022
‘माननीय शरद पवारांना मुख्यमंत्र्यांनी स्वतःचा चार्ज दिला आहे का? आणि जर नाही तर ते घटनाबाह्य संविधानाला डावलून मंत्री आणी अधिकाऱ्यांची बैठक कशी काय घेऊ शकतात? आणी शरद पवारांना बैठका घ्यायचाच असतील तर मुख्यमंत्री त्यांना चार्ज का देत नाहीत? केवळ एकच निदान माफक अपेक्षा,’ असं राम कदम (Ram Kadam) यांनी ट्वीटच्या माध्यमातून सांगितलं आहे.
एसटी संपाबाबत कृती समितीबरोबर आज विस्ताराने चर्चा केली. माझ्या दृष्टीने प्रवासी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. गेले दोन महिने संपामुळे प्रवाशांची जी स्थिती झाली, त्याबद्दलचे वर्णन न केलेले बरे. त्यातच कोरोनाचा नवा अवतार आल्यामुळे महाराष्ट्रावर आणखी एक संकट कोसळले आहे. pic.twitter.com/vTly8wDnPA
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 10, 2022
बैठकीत पवार काय म्हणाले –
एसटी संपामुळे राज्यभरातील प्रवाशांना प्रचंड त्रास होत आहे. त्यातच पुन्हा कोरोना संकट समोर आलं आहे. त्यामुळे राज्यातील अर्थकारणावर परिणाम होतोय. त्यामुळे राज्यातील राज्य सरकारला त्याची मोठी आर्थिक किंमत द्यावी लागत आहे. कृती समितीच्या सदस्यांचे काही प्रश्न आहेत, त्यातील काही प्रश्नांकडे कृती समितीने सरकारचे लक्ष वेधले आहे. या प्रकरणी सकारात्मक निर्णय घेण्याचे सरकारचे प्रयत्न असतील, असे राज्य सरकारने सांगितले. त्यानंतर आता एसटी सेवा सुरू झाली पाहिजे, कर्मचाऱ्यांनी कामावर यायला पाहिजे, असे आवाहन शरद पवार यांनी केले.
काय म्हणाले अनिल परब ?
एसटी कामगारांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 28 टक्के महागाई भत्ता व घरभाडे भत्ता देण्यात आल्यानंतरही केवळ विलिनीकरणासाठी संप सुरु ठेवण्यात आला आहे. राज्यभरात एसटी बंद असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. आतापर्यंत ज्या संपकरी कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही, अशा सुमारे 50 हजार कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू झाल्यास त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली जाणार नाही. त्याचबरोबर बडतर्फ, निलंबित आणि सेवासमाप्ती यासारख्या कारवाई झालेल्या संपकरी कर्मचाऱ्यांच्याबाबतीत वाहतूक सुरळीत सुरु झाल्यानंतर सकारात्मक विचार करू
Web Title : Ram Kadam | bjp ram kadam ncp sharad pawar shivsena anil parab st strike meeting sahyadri
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Maharashtra Crime News | पोलीस वसाहतीमध्ये गृहरक्षक तरुणीने घेतले जाळून
Zero Rupee Note In India | झीरो रुपयाची नोट छापण्याची भारतात का भासली होती गरज? जाणून घ्या कारण